Tuesday, July 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

महाविहार मुक्ती आंदोलनासाठी पुण्यातून जाणार 2 हजार धम्म बांधव 

पुणे : बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या 14 ऑक्टोबर ला मुंबई येथे  महाबोधी विहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी पुणे शहरातून तब्बल दोन हजार धम्म बांधव जाणार आहेत अशी माहिती आंबेडकर चळवळीतील नेते परशुराम वाडेकर यांनी दिली.
नुकतीच यासंदर्भात भन्ते नागघोष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीमध्ये पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्ष झाले ब्राह्मण व्यवस्थापन आहे. ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले हे महाबोधी विहार मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी फेब्रुवारी 2025 पासून बौद्ध भिक्खू बिहारमधील जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र बोधगया इथं आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला भारतासह जगभरातून पाठिंबा मिळत आहे. बीटी कायदा म्हणजेच बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्याची या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.

मुंबई येथे होणाऱ्या 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनात केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील सर्व आंबेडकरी चळवळी मधील नेते आणि बौद्ध अनुयायी सहभागी होणार असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.
दरम्यान, या आंदोलनाच्या नियोजन करण्यासाठी शहरातील विविध बुद्ध विहारात बैठका सुरू आहेत. तर 12 ऑक्टोबर रोजी पुण्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांची एकत्रित आढावा बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading