Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांना

पुणे: प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती करण्याचे अधिकारी भारतीय जनता पक्षाने जिल्हा पातळीवरील नेत्यांना दिले आहेत. मात्र, शक्यतो सर्वत्र महायुती म्हणून निवडणूक लढविण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा विभागवार आढावा भाजपकडून घेतला जात आहे. पश्चिम विभागातील महापालिकांपासून पंचायत समिती पर्यंत सर्व जागांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येथे घेण्यात आला. त्यावेळी फडणवीस यांनी उपस्थित पदाधिकारी आणि नेत्यांना निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना केल्या.

स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन युती करण्याचा अधिकार जिल्हा पातळीवरील नेत्यांना देण्यात आला आहे. मात्र, जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा पक्ष नेतृत्वाचा आग्रह आहे. ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढणे शक्य नसेल त्या ठिकाणी मित्र पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ज्या अपवादात्मक ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढता येणार नाही आणि मित्र पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवावी लागत असेल त्या ठिकाणी मित्रपक्षांवर टोकाची टीका केली जाऊ नये, अशा सूचना देखील नेते आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading