एसकेएफतर्फे दिव्य पुरोहित यांची ल्युब्रिकेशन लाइफटाइम सोल्यूशन्सचे भारत प्रमुख म्हणून नियुक्ती
पुणे : बेअरिंग्ज, ल्युब्रिकेशन लाइफटाइम सोल्यूशन्स, कंडिशन मॉनिटरिंग आणि रोटेटिंग इक्विपमेंट सर्व्हिसेस यांसाठी भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञान आणि सुविधा पुरवठादार कंपन्यांपैकी एक एसकेएफ इंजिनिअरिंग अँड ल्युब्रिकेशन इंडिया प्रा. लि. ने दिव्य पुरोहित यांची ल्युब्रिकेशन लाइफटाइम सोल्यूशन्सचे भारत प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
नव्या भूमिकेत पुरोहित नाविन्यपूर्णता, उत्पादन, कामकाज उत्कृष्टता ग्राहक-केंद्रित मूल्य निर्मिती यावर लक्ष केंद्रित करून भारतातील एसकेएफच्या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या ल्युब्रिकेशन सोल्यूशन्स व्यवसायाचे नेतृत्व करतील.
दक्षिण आशिया, युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका या प्रदेशांमध्ये दोन दशकांहून अधिक आंतरराष्ट्रीय नेतृत्व अनुभव असलेल्या पुरोहित यांना व्यवसाय विस्तार, शाश्वततेला चालना आणि औद्योगिक परिसंस्थेत चक्रीयता रुजविण्याचा सिद्ध अनुभव आहे. त्यांनी याआधी बुहलेर ग्रुपमध्ये दक्षिण आशियासाठी ग्रेन्स अँड फूड व्यवसाय प्रमुख आणि ॲटलास कॉर्पोमध्ये भारत व नेपाळसाठी बिझनेस लाईन मॅनेजर म्हणून काम केले असून, तिथे त्यांनी व्यवसाय विस्तार तसेच संघटनात्मक क्षमता मजबूत करण्याचे काम केले.
एसकेएफचे LLS इंडिया हेड दिव्य पुरोहित म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे आणि बंगळुरूमधील आमच्या जागतिक दर्जाच्या हरित उत्पादन केंद्राच्या बळावर भारतातील एसकेएफचे मजबूत ब्रँड स्थान आम्हाला या वाढीला पाठिंबा देण्यासाठी सक्षम बनवते. मेक इन इंडिया उपक्रमाशी सुसंगत आम्ही आमचे प्रगत ल्युब्रिकेशन सोल्यूशन्स अधिक प्रमाणात स्थानिक स्तरावर तयार करण्यास कटिबद्ध आहोत. त्यामुळे ग्राहकांना जागतिक मापदंड पाळणाऱ्या पण स्थानिक पातळीवर उत्पादित प्रणालींचा लाभ होईल. आमचा भर ग्राहकांना सर्वोत्तम ल्युब्रिकेशन सोल्यूशन्स देण्यावरच राहील आणि भारताच्या प्रगतीच्या चाकांना सुरळीत फिरविण्याची आमची भूमिका आम्ही व्यवस्थित पार पाडू.”
पुरोहित पुढे म्हणाले, “नाविन्यपूर्णतेची आस असलेला असा हा उद्योग आहे. माझी धारणा अगदी साधी सोपी आहे. प्रत्येक गोष्टीसाठी नेहमीच एक अधिक चांगला मार्ग असतो. एसकेएफमध्ये, आमची वैविध्यपूर्ण आणि सहकार्यशील संस्कृती आधीपासूनच कल्पनांना सर्व स्तरांवर मुक्तपणे व्यक्त होण्यास आणि आकार घेण्यास प्रोत्साहित करते. माझे ध्येय हे ही उत्सुकता, सहकार्य, काळजी आणि धैर्य या संस्कृतीला अधिक बळकट करणे आहे. त्यायोगे आपण वेगवेगळ्या विभागात आपल्या ग्राहकांसाठी विश्वासार्ह भागीदार बनून राहत एकत्रपणे कामकाज उत्कृष्टता, शाश्वत विकास आणि दीर्घकालीन मूल्य साध्य करू.”
