Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

इन्श्युरटेक कंपनी ‘टर्टलमिंट’कडून ‘आयपीओ’साठी गोपनीय कागदपत्रे सेबीकडे सादर

टर्टलमिंट फिनटेक सोल्यूशन्स लिमिटेड या इन्श्युरटेक कंपनीने प्रस्तावित प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) सेबीकडे गोपनीय प्री-फाइलिंग पद्धतीने कागदपत्रे दाखल केली आहेत.

या कंपनीने प्रस्तावित प्राथमिक समभाग विक्रीसंदर्भात प्री-फाइल केलेला ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ सेबीकडे व स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सादर केला आहे. कंपनीचे इक्विटी समभाग या संस्थांमध्ये सूचीबद्ध होणार आहेत, असे विमा सल्लागारांवर केंद्रित असलेल्या या मुंबईस्थित स्टार्टअपने घोषित केले आहे.

या ‘आयपीओ’च्या प्रक्रियेसाठी कंपनीने आयसीआयसीआय सिक्युरिटीज, जेफ्रीज इंडिया, जेएम फायनान्शियल आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर्स या आघाडीच्या व्यापारी बँकर्सची नेमणूक केली आहे, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले.

धीरेंद्र मह्यावंशी आणि आनंद प्रभुदेसाई यांनी २०१५ मध्ये स्थापन केलेली टर्टलमिंट कंपनी ही विमा पॉलिसींची खरेदी व तिचे व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी उभारण्यात आली आहे. या कंपनीने आपल्या पाच लाखांहून अधिक सल्लागारांच्या जाळ्यातून १.६ कोटी पॉलिसी विकल्या आहेत.

कंपनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वित्तीय सल्लागार ग्राहकांच्या गरजेनुसार त्वरित योग्य त्या विमा योजना उपलब्ध करून देऊ शकतात. त्यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक कार्यक्षम होतो.

‘टर्टलमिंट’ला अमांसा कॅपिटल, जंगल व्हेंचर्स आणि नेक्सस व्हेंचर पार्टनर्स यांचे साह्य आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading