Friday, September 18, 2026
BusinessLatest News

गोदरेज व्हॅल्यू को-क्रिएटर्स क्लब सीरिजने शहरी रचनेसाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या डिझाइनला एक ट्रेंड म्हणून अधोरेखित केले

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एक भाग असलेल्या लॉक्स अँड आर्किटेक्चरल सोल्युशन्सने त्यांच्या महत्त्वाच्या माहिती शेअरिंग सीरिजमधील व्हीसी लाईव्ह सीझन 3 मधून मिळालेले निष्कर्ष जाहीर केले. गोदरेज व्हॅल्यू को-क्रिएटर्स क्लबने (GVCC) सुरू केलेला हा उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे. यात आर्किटेक्ट, शहरी डिझायनर्स आणि टिकाऊ तसेच सर्वसमावेशक शहरीकरणासाठी उत्साही व्यावसायिकांचा एक समुदाय सहभागी आहे. हा उपक्रम डिझाइन-लेड  नवोपक्रमासाठी ब्रँडची वचनबद्धता दर्शवतो तसेच सुरक्षित, स्मार्ट अशा शहर रचनेतील स्वतःची भूमिका अधोरेखित करतो.

पाच भागांच्या या मालिकेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. ज्यामुळे डिझायनर्सना वेगवेगळे पर्याय मिळण्यासोबतच त्यांच्या काही समस्यांवर तोडगा देखील मिळाला. शहरातील राहणीमान उंचावण्यासाठी सुरक्षा उपायांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले, त्यानंतर चालणाऱ्यांसाठी योग्य रस्ते आणि उत्तम सार्वजनिक वाहतूक याला प्राधान्य मिळाले आहे. शहरांसाठी सध्याची सर्वात तातडीची गरज म्हणजे उद्याने आणि निसर्गरम्य जागा. बाईक लेन आणि समाज केंद्रांसारख्या पर्यायांपेक्षा त्याला जास्त महत्त्व आहे. थोडक्यात शहरांच्या नियोजनात पर्यावरणीय संतुलनाला लोकांचे किती प्राधान्य आहे, ते समोर आले.

या संपूर्ण मालिकेत टिकाऊपणाचा उल्लेख वारंवार झाला आहे. बहुतेक सहभागींच्या (51%) मते, रचनेचा टिकाऊपणाशी जवळचा संबंध आहे. साहित्य किंवा ऊर्जा कार्यक्षमतेपेक्षाही याचा प्रभाव जास्त असतो. 86% लोकांनी शाश्वत आणि नावीन्यपूर्ण डिझाइन पद्धतींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सत्रांची गरज मंडळी. भविष्याचा विचार करायचा तर 60% प्रतिसादकर्त्यांनी शाश्वत डिझाइन हेच वास्तुकलेचे भविष्य ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. स्मार्ट तंत्रज्ञान आणि समुदाय-केंद्रित नियोजनापेक्षाही त्याचे स्थान वरचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उद्याच्या शहरांचे प्राधान्य कोणत्या गोष्टीला असेल, असे विचारले असता, 41% लोकांनी निसर्गरम्य आणि खुल्या जागांच्या निर्मितीला पसंती दिली, त्यानंतर हवामान-अनुकूल पायाभूत सुविधांची गरज – ही वाढ तसेच कल्याणासह संतुलित शहरी वातावरणाची सामूहिक गरज अधोरेखित केली.

या उपक्रमाच्या यशाबद्दल गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या लॉक्स आणि आर्किटेक्चरल सोल्युशन्सचे व्यवसाय प्रमुख श्री. श्याम मोटवानी म्हणाले, “व्हीसी लाईव्हच्या माध्यमातून, आम्ही जागतिक रचनाकारांना भारताच्या डिझाइन आणि आर्किटेक्चर समुदायाशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवतो. या संवादातून वेगवेगळ्या बदलांची प्रेरणा मिळते. आमच्या समुदायाकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा मानवी संबंधांना जोपासणाऱ्या आणि आपली शहरे सर्वांसाठी कशी कार्य करू शकतात याची पुनर्कल्पना करणाऱ्या डिझाइनसाठी एक स्पष्ट आणि तातडीची गरज दर्शवतात. मजबूत सहभाग या संवादाची प्रासंगिकता प्रमाणित करत नाही तर या कल्पनांना पाठिंबा देण्याची आमची जबाबदारी देखील मजबूत करतो.”

शाश्वत शहरी नियोजनापासून ते भविष्यासाठी योग्य अशा वास्तुकलेपर्यंतच्या विषयांवरील संभाषणांना चालना देण्यासाठी जीव्हीसीसी बॅनरखाली आयोजित व्हीसी लाईव्ह सीरिज एक गतिमान व्यासपीठ म्हणून काम करते. जगभरातील सहभागी, व्यावसायिक, विद्यार्थी आणि डिझाइनप्रेमी लोकांना हे एकत्र आणते. परिणामी, कल्पना तसेच दृष्टिकोनांची समृद्ध देवाणघेवाण होते. आपल्या सदस्यांना वेगवेगळ्या डिझाइन्स, ट्रेंड रिपोर्ट्स, बक्षिसे आणि गीव्हीज अवॉर्ड्स सारख्या उपक्रमांद्वारे ओळख असे विशेष फायदे जीव्हीसीसी देते.

भारतात जागांची सुरक्षा कशाप्रकारे केली जाते, त्यांचे डिझाइन कसे असते हे उत्कृष्टतेचा वारसा आणि भविष्य-केंद्रित दृष्टिकोनासह, लॉक्स अँड आर्किटेक्चरल सोल्युशन्स नव्याने सांगते आहे. प्रत्येक टप्प्यावर नावीन्य, सहकार्य आणि शाश्वततेला चालना देत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading