फॅशन कंपनी नेक्सटचे मिंत्राच्या सहयोगाने भारतात पदार्पण
पुण्यात पॅव्हिलियन मॉल येथे भारतातील पहिल्या स्टोरचे उदघाटन संपन्न
पुणे : युकेच्या प्रसिद्ध फॅशन ब्रॅंड नेक्स्टने आज मिंत्रा जबॉन्ग इंडिया आणि त्यांच्या फ्रँचाईझी भागीदारांच्या सहयोगाने भारतात आपले एक्सक्लुझिव्ह ब्रॅंड स्टोअर (EBS) अधिकृतरित्या सुरू केल्याचे घोषित केले. एमजीआयपीएल ही मिंत्राची बी टू बी घाऊक शाखा आहे. नेक्स्ट सोबत सदर धोरणात्मक सहयोगाचा एक भाग म्हणून या ब्रॅंडच्या विविध उतपदानांची श्रेणी वितरित करण्याचा परवाना प्राप्त अधिकार एमजीआयपीएल कडे आहे आणि त्यांच्या परवाना प्राप्त फ्रँचाईझी भागीदारांना भारतात नेक्सटची ओम्नी-चॅनल उपस्थिती वाढवताना दुकाने उघडून ते चलविण्याचे अधिकार ब्रॅंडकडून मिळाले आहेत.
१९८२ मध्ये स्थापन झालेली नेक्स्ट ही कंपनी उत्कृष्ट डिझाईन, अतुलनीय गुणवत्ता आणि खऱ्या मूल्यांसह क्लासिक समकालीन शैली आणि अत्याधुनिकतेमध्ये पारंगत असल्याबद्दल वाखाणली जाते. नेक्स्ट ची युके मध्ये ४६० स्टोअर्स, २६५आंतरराष्ट्रीय फ्रँचाईझ आउटलेट्स आणि जगभरातील ८० देशांमध्ये ऑनलाइन उपस्थिती असून युके मधली सर्वात मोठी फॅशन रिटेलर म्हणून नेक्स्ट ने आपली ओळख स्थापित केली आहे. या कंपनीचा फोकस सुंदररित्या डिझाईन केलेली तसेच जबाबदारीने प्राप्त केलेली आणि माफक किंमतीची दर्जेदार उत्पादने सादर करण्यावर आहे.
भारतात सणासुदीच्या मोसमाच्या अगोदर पहिले दुकान अधिकृतरित्या सुरू करणे हा नेक्स्ट च्या भारतातील प्रवासाकहा एक लक्षणीय टप्पा आहे. त्यांचे हे पहिले दुकान पुण्यात असून ते तब्बल ७,१०० चौ. फुट क्षेत्रफळात पसरले आहे. ते नेक्स्ट ची खास अभिजातता आणि आधुनिकतेचे प्रतीक आहे, जे भारतीय खरेदीदारांना आपल्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या फॅशनच्या जवळ घेऊन जाते. जगभरात सगळीकडे नेक्स्ट स्टोअरची रचना अशाप्रकारे केलेली असते की, ज्यातून ग्राहकांना उत्पादनांच्या विविध श्रेणी सहजतेने बघता येतात. या उत्पादनांची मांडणी विचारपूर्वक केलेली असते, ज्यामुळे ग्राहकांसाठी खरेदीचे आकर्षक वातावरण निर्माण होते. याच डिझाईन सिद्धांताशी सुसंगत राहून पुण्याच्या पव्हेलियन मॉल या गजबजलेल्या ठिकाणी उघडलेले नेक्स्ट चे दुकान ग्राहकांना खऱ्या अर्थाने या ब्रॅंडचा शॉपिंग अनुभव प्रदान करते आणि पुरुष, महिला आणि मुलांच्या श्रेणीतील नवीनतम फॅशनचे दर्शन घडवते.
एक्सक्लुझिव्ह ब्रॅंड आउटलेट्स (EBO) व्यतिरिक्त, शॉपर्स स्टॉप सारख्या भारतातील एका लार्ज-फॉरमॅट-मल्टी-ब्रॅंड रिटेल स्टोअर्समध्ये शॉप-इन-शॉप फॉरमॅटच्या माध्यमातून देखील नेक्स्ट आपला प्रसार करणार आहे. शॉपर्स स्टॉपमध्ये आधीच १० शॉप-इन-शॉप्स कार्यरत आहेत. या धोरणामुळे स्टँडअलोन लोकेशन्सच्या पलीकडे नेक्स्ट ची पोहोच वाढेल. येत्या पाच ते सहा वर्षांत एमजीआयपीएल च्या परवाना प्राप्त फ्रँचाईझी भागीदारांच्या सहयोगाने भारतात ५० पेक्षा जास्त पॉईंट्स ऑफ सेल (EBOs आणि शॉप-इन-शॉप फॉरमॅटमध्ये) सुरू करण्याचे नेक्स्ट चे लक्ष्य आहे. त्यापैकी हैदराबाद, दिल्ली, मुंबई आणि बंगळूर येथे लवकरच नेक्स्टचे आगमन होईल.
या ब्रॅंडच्या भारतातील पहिल्या दुकानाच्या लॉन्चविषयी बोलताना मिंत्राचे चीफ ऑफ स्ट्रॅटजिक पार्टनरशिप अँड ओम्नी-चॅनल, वेणू नायर म्हणाले, “ नेक्स्ट सोबतचा आमचा धोरणात्मक सहयोग भारतीय उपभोक्त्यांना या ब्रॅंडच्या जागतिक पातळीवर वाखाणल्या गेलेल्या कलेक्शनपर्यंत पोहोच मिळवून देईल. महिला, पुरुष आणि लहान मुलांच्या कपड्यांमध्ये बेजोड डिझाईन आणि गुणवत्ता याबद्दल प्रसिद्ध असलेल्या या ब्रॅंडने विविध श्रेणींमधील फॅशन मार्केटमध्ये उपभोक्त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खास करून लहान मुलांच्या कपड्यांच्या बाबतीत सांगायचे तर, लहान मुलांचे प्रीमियम फॅशन मार्केट सध्या पुरते विकसित दिसत नाही, त्यामुळे फॅशन बाबत जागरूक माता-पित्यांसाठी या बाजारात मर्यादित पर्याय आहेत.”
ते पुढे म्हणाले, “भारतातील प्रीमियम डिपार्टमेंटल स्टोअरचे प्रणेते शॉपर्स स्टॉपशी हातमिळवणी करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांचा दमदार वारसा, उपभोक्त्यांशी असलेले दृढ नाते आणि व्यापक फुटप्रिंट यामुळे नेक्स्ट चे जागतिक दर्जाचे कलेक्शन भारतीय खरेदीदारांपर्यंत घेऊन येण्यासाठी आम्ही त्यांना विश्वसनीय भागीदार बनवले आहे.”
नेक्स्ट च्या प्रवक्त्याने सांगितले, “पुण्यात आमच्या पहिल्या नेक्स्ट स्टोअरचे उद्घाटन हा आमच्या आणि मिंत्राच्या भागीदारीतील एक महत्त्वाचा क्षण आहे. आमच्या भारतीय ग्राहकांपर्यंत नेक्स्ट चा रिटेल अनुभव घेऊन येताना आणि त्यांना आमच्या नवीनतम कलेक्शनपर्यंत थेट पोहोच प्रदान करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”
जागतिक स्तरावर भारत ही नेक्स्ट साठी एक महत्त्वाची धोरणात्मक बाजारपेठ आहे. भारतातील वाढता उपभोक्ता बेस, आंतरराष्ट्रीय फॅशनची उच्च आणि वाढती मागणी आणि मजबूत रिटेल इन्फ्रास्ट्रक्चर यामुळे या ब्रॅंडच्या आंतरराष्ट्रीय विकास धोरणात भारत केंद्रस्थानी आहे. २०२३ मध्ये मिंत्रा प्लॅटफॉर्मवर लॉन्च केल्यानंतर, नेक्स्ट ने दमदार मागणी आणि निरंतर विकास अनुभवला आहे. यावरून भारतातील प्रीमियम ग्राहकांच्या बेसने या ब्रॅंडला स्वीकारल्याची साक्ष मिळते. भारतातील पहिल्या नेक्स्ट ब्रॅंड स्टोअरचा शुभारंभ हा एक खास ऑफलाइन फॅशन अनुभव उभा करण्याच्या, ब्रॅंडच्या ऑनलाइन उपस्थितीस पूरक होण्याच्या आणि भारतीय खरेदीदारांसाठी नेक्स्ट एक विश्वासार्ह डेस्टिनेशन म्हणून स्थापित करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा क्षण आहे.
