बिकट परिस्थितीला बदलण्यासाठी शिक्षक व पुरोहित यांची खरी गरज – डॉ. मिलिंद भोई यांचे मत
पुणे : आजच्या आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञान संस्कारांची जागा घेऊ शकत नाहीत. आजचे वातावरण पहिले तर चांगले संस्कार हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे. आजच्या बिकट परिस्थितीला बदलण्यासाठी शिक्षक व पुरोहित यांची खरी गरज आहे. कारण समाजात त्यांचे ऐकले जाते, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केले
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राच्या वतीने स्व. माधवराव भणगे स्मृती प्रित्यर्थ दीपस्तंभ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बाजीराव रस्त्यावरील वरदश्री सभागृहात पुरस्कार सोहळा झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष अनिल देशपांडे, कार्यवाह ॲड.सुहास भणगे, कुंदनकुमार साठे, विश्वनाथ भालेराव, स्व. माधवराव भणगे स्मृती प्रतिष्ठानचे सुनील भणगे, पुणे केंद्राचे केंद्रप्रमुख मकरंद माणकीकर उपस्थित होते.
अश्विनी गानू, मंदार रांजेकर, तेजस देवधर, मुक्तल मवाळ, गौरीश नेर्लेकर, सुबोध पारगावकर, जयश्री देशपांडे, पुरुषोत्तम काशीकर, अनघा जोशी, रोहिणी जोशी, अनिल शिदोरे, अभिषेक खेडकर, दीपक दाते, मनोहर भंडारकर, राजीव पाटसकर तसेच पुणे वेदपाठ शाळा, हरीकीर्तनोत्तेजक सभा, देवदेवेश्वर संस्था आणि महाराष्ट्र एक्झिक्युटर ट्रस्ट कंपनी या संस्थांना सन्मानित करण्यात आले.
दिप्ती थोरात यांनी सूत्रसंचालन केले , विश्वनाथ भालेराव (कार्यवाह पुणे केंद्र यांनी पुणे) केंद्राची माहिती दिली. अनिल देशपांडे (कार्याध्यक्ष मध्यवर्ती) यांनी प्रास्ताविक केले , मकरंद माणकीकर यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र देवधर यांनी आभार मानले.
