Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड ने महेश सूर्यवंशी यांचा गौरव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा यथोचित सन्मान

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड च्या वतीने ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांना इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड चे उपाध्यक्ष डॅा. दीपक हरके यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. महेश सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून व त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने अनेक समाजोपयोगी प्रकल्प ट्रस्टच्या माध्यमातून राबविले जात आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणून ओळखले जाते. या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे. त्यामुळे यामाध्यमातून मानसेवेचे कार्य करणाऱ्या सूर्यवंशी यांना गौरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading