Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

शारदीय नवरात्राचे औचित्य साधत ‘स्त्रीदेवतांची रूपे’ विषयावर होणार मास्टर क्लास

पुणे  : पुण्यातील इंडी हेरीटेज व परिमल अँड प्रमोद चौधरी फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मास्टर क्लास’ उपक्रमांतर्गत मूर्तिशास्त्र विषयावरील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे ‘स्त्रीदेवतांची रूपे’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

शारदीय नवरात्राचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा मास्टर क्लास शनिवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील नवलमल फिरोदिया सभागृह येथे संपन्न होईल. व्याख्यान सर्वांसाठी खुले असून त्यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही.

देशातील प्राचीन मंदिरे व लेणी यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसणारे स्त्रीदेवतांचे अंकन, त्यांची वैशिट्ये व संबंधित भक्ती व सामाजिक परंपरा यावर डॉ. देगलूरकर यांचे विचार ऐकण्याची संधी या व्याख्यानाच्या निमित्ताने पुणेकरांना मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading