Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

भारतातील सर्वाधिक वाजवी किंमतीतील परवडणारे इलेक्ट्रिक रूम फ्रेशनर एअर प्लग सादर

मुंबई : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) चा गोदरेज एअर या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या फ्रॅग्रन्स ब्रँडने गोदरेज एअर प्लग या आपल्या प्रीमियम इनोव्हेशन सादरीकरणासह एअर केअर श्रेणीची पुनर्व्याख्या केली आहे. भारतातील सर्वात परवडणारे इलेक्ट्रिक रूम फ्रेशनर म्हणून ओळखले जाणारे एअर प्लग प्रतिदिन फक्त 2.5 रु. वापर खर्चात प्रीमियम फ्रॅग्रन्स अनुभव देते.

फक्त 149 रु. मध्ये उपलब्ध असलेले हे उपकरण स्मार्ट हीटर तंत्रज्ञानासह येते आणि सलग 60 दिवस सुगंधित वातावरण सुनिश्चित करते. डिस्को – GCPL च्या मल्टी-डिसिप्लिनरी इन-हाऊस डिझाईन स्टुडिओद्वारे डिझाईन केलेले एअर प्लग आधुनिक, स्टायलिश डिझाईनमध्ये तयार केलेले असून आधुनिक, समकालीन घरे आणि ऑफिस इंटेरियरशी पूर्णपणे सुसंगत आहे.

भारताची 3,000 कोटी रु. ची एअर फ्रेशनर बाजारपेठ पुढील पाच वर्षांत दुप्पट होईल असा अंदाज असताना हे सादरीकरण करण्यात येत आहे. जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक डिफ्यूझर्स लोकप्रिय असले तरी त्यांची जास्त किंमत भारतात त्यांच्या वापरासाठी अडथळा ठरली आहे. येथे 1000 कोटी रु. च्या बाजारपेठेसह स्प्रे अजूनही वर्चस्व राखून आहेत. गोदरेज एअर प्लगने ही दरी भरून काढत  किफायतशीरपणा, प्रीमियम फ्रॅग्रन्स, सतत डिफ्यूजन आणि आकर्षक डिझाईन यांचा संगम घडवून प्रत्येक घरासाठी इलेक्ट्रिक रूम फ्रेशनर्स सुलभ केले आहेत.

या नाविन्यपूर्ण सादरीकरणाबद्दल बोलताना GCPL होम केअरच्या मार्केटिंग प्रमुख शिल्पा सुरेश  म्हणाल्या, “GCPL मध्ये नाविन्यपूर्णता ही आमच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि आमचा  गोदरेज एअर पोर्टफोलिओ त्याचे प्रतिबिंब आहे. ग्राहकांची घर, ऑफिस आणि कारसाठी प्रीमियम फ्रॅग्रन्स अनुभवाची वाढती मागणी लक्षात घेऊन एअर स्प्रे पासून एअर मॅटिक आणि एअर ओ पर्यंत आम्ही सातत्याने सर्वोत्तम उत्पादने आणली आहेत. नवीन एअर प्लग उत्पादन स्प्रे आणि इलेक्ट्रिक डिफ्यूझर्स यांच्यातील मोठी किंमतीची दरी भरून काढते आणि प्रीमियम फ्रॅग्रन्स परवडणाऱ्या किमतीत देते. ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक स्प्रे डिफ्यूझर स्टार्टर किट 550 रु. पेक्षा जास्त दरात उपलब्ध असताना एअर प्लग स्टार्टर किट फक्त 149 रु. मध्ये उपलब्ध आहे आणि 60 दिवसांपर्यंत त्याचा सुगंध टिकतो. यासाठी वापर खर्चात 70% पेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. हे व्हायलेट आणि रोझ या दोन प्रीमियम फ्रॅग्रन्समध्ये उपलब्ध असून ते भारतातील सर्वाधिक पसंत केलेले रूम फ्रेशनर सुगंध आहेत. आम्हाला विश्वास आहे की एअर प्लग केवळ नवीन ग्राहकांना आकर्षित करेल एवढेच नाही तर सध्याच्या स्प्रे वापरणाऱ्या ग्राहकांनाही अपग्रेड करेल.”

एअर प्लगच्या डिझाईनविषयी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) चे डिझाईन ग्लोबल हेड दर्शन गांधी म्हणाले, “गोदरेज एअर प्लग ही एक सुटसुटीत, आटोपशीर, सहज वापरता येणारी, बोल्ड डिझाईन असलेली आणि स्पष्ट उद्देशाने तयार केलेली निर्मिती आहे. यातून हा ब्रँड आजवर नेहमीच करत आल्याप्रमाणे प्रत्येक घरात आनंद आणत आहे. गोदरेज मधील आमच्या इन-हाऊस डिझाईन स्टुडिओ डिस्को येथे डिझाईन, मॉडेल आणि पॅकेज केलेले हे उत्पादन ताजेतवाने, नवेपण देणारे वाटावे म्हणून तयार केले गेले आहे. मिंटी शेडमध्ये असून ते शांतपणाचे प्रतीक आहे. आपल्या वेगळ्या साधेपणामुळे एअर प्लग सगळ्यामध्ये उठून दिसते आणि स्वरूप, कार्य आणि सुगंध यांचा सुरेख संगम घडवते.”

स्मार्ट हीटर तंत्रज्ञानासह सुसज्ज असलेले एअर प्लग आवश्यक तेलांनी समृद्ध सुगंधासह 60 दिवसांपर्यंत सतत फ्रॅग्रन्स पुरवते. हे दोन प्रीमियम व्हेरिएंट्समध्ये सादर केले जात आहे:

एअर प्लग इलेक्ट्रिक डिफ्यूझर विथ रिफिल 149 रु. मध्ये उपलब्ध आहे तर स्वतंत्र रिफिल 99 रु. मध्ये मिळेल. हे मॉडर्न ट्रेड, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि जनरल ट्रेड आऊटलेट्समध्ये उपलब्ध असेल. त्यायोगे प्रीमियम फ्रॅग्रन्स आता स्टायलिश आणि परवडणारे बनले आहे.

  • व्हायलेट ब्लूम – शांत करणारा लॅव्हेंडर आणि पॅचुली, ताजेतवाने पेपरमिंट आणि सीडरवुडच्या सुगंधासह; उत्कृष्ट ब्लूम आणि अप्रिय वास लपविण्याची ताकद.
  • रोझ ब्लॉसम – सायट्रस आणि लवंगाच्या सूक्ष्म गंधासह गुलाब व मिश्र फुलांचा सुवास

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading