नेतृत्व मजबूत करण्यासाठी इंटेरिओ बाय गोदरेजचा नवीन धोरण
मुंबई : गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपमधील एक आघाडीचा फर्निचर ब्रँड इंटेरियोने घरे तसेच ऑफिसेसमध्ये भारतीय संस्कृतीला आधुनिक टच देत वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून आपली नवीन ओळख समोर आणली आहे. हे परिवर्तन सर्व कॉमर्स चॅनल, रिटेल विस्तार, भविष्यासाठी योग्य उत्पादन पोर्टफोलिओ आणि डिझाइन-नेतृत्वाखालील नवोपक्रमासाठी घडले आहे. 2024 मध्ये गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने जाहीर केलेल्या रिपोझिशनिंग धोरणावर हे रीब्रँडिंग आधारित आहे.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या कार्यकारी संचालक न्यिरिका होळकर म्हणाल्या: “उत्तम डिझाइन सर्वांसाठी आणि सर्वांच्या आवाक्यात आणणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. उद्योगातील आघाडीचे नाव म्हणून, डिझाइन आणि उत्पादनापासून ते किरकोळ विक्री आणि सेवेपर्यंतच्या आमच्या एंड-टू-एंड सोल्यूशन्ससह आम्ही हे वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही आदर्श आहोत. कॉन्फिगर करण्यायोग्य फर्निचर प्लॅटफॉर्मसारख्या उत्पादन नवकल्पनांमुळे मोठ्या प्रमाणात कस्टमायझेशन शक्य होईल, तर डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोन ऑनलाइन ग्राहकांसाठी सोयीस्कर आणि एक उत्तम खरेदी अनुभव सक्षम करेल. आमच्या स्टोअर्सची देखील आम्ही पुनर्रचना करत आहोत. ज्यायोगे ग्राहकांसाठी ती प्रेरणास्थाने ठरतील. या रीब्रँडसह आम्ही लाइफस्टाइल ब्रँड म्हणून एक नवीन अध्याय सुरू करतो आहोत.” या ब्रँड रिफ्रेशचा एक भाग म्हणून, घरे तसेच संस्थांमध्ये कोणत्या प्रकारचे फर्निचर घेतले जाते हे शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची आवड निवड तपासली.
विस्ताराच्या धोरणानुसार, इंटेरिओ बाय गोदरेज पुढील 3 वर्षांत एकूण 15000 स्टोअर्स सुरू करणार आहे. याशिवाय ग्राहकांनी स्वतःच्या इच्छेने काही तयार करावे यासाठी हा ब्रँड अनेक पर्याय उपलब्ध करून देईल, नवनवीन कल्पना सुचण्यास मदत करेल आणि त्यांच्या निवडीला पर्सनल टच देण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी एक नवीन स्टोअर फॉरमॅट देखील सादर करेल. सुधारित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि खोलवर रुजलेल्या एआर अनुभवांसह नवीन डिजिटल स्ट्रॅटेजी अंतर्गत भारतातील 18,000+ पिनकोडवर ग्राहकांना ओम्नीचॅनेल शॉपिंगची सोय उपलब्ध करून देईल. नावीन्यपूर्ण उत्पादनांमध्ये मॉड्यूलर, कॉन्फिगर करण्यायोग्य फर्निचर समाविष्ट आहे जे विकसित जीवनशैलीशी जुळवून घेण्यासाठी आणि भारताच्या वाढत्या इच्छा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या उपक्रमांसह, इंटेरिओ बाय गोदरेजचे पुढील 3 वर्षांत दुप्पट वाढ नोंदवत 10,000 कोटी रुपयांपर्यंत जाण्याचे उद्दिष्ट आहे.
इंटेरिओ बाय गोदरेजचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष स्वप्नील नगरकर म्हणाले, “इंटेरिओची नवीन ओळख ही आधुनिक, महत्त्वाकांक्षी आणि डिझाइनच्या क्षेत्रातील एक निर्विवाद नेतृत्व अशी आहे. या वैशिष्ट्यांसह नेतृत्व करत असतानाच गोदरेजचा वारसा आणि विश्वासाचे देखील पाठबळ आहे.”
ते पुढे म्हणाले: “आम्ही आमच्या सर्वचॅनेल रिटेल फूटप्रिंटचा विस्तार करत आहोत आणि त्यासोबतच उत्पादन क्षमता, स्मार्ट तंत्रज्ञान आणि सप्लाय चेन परिवर्तनातही गुंतवणूक करत आहोत. समकालीन, डिझाइन-लेड फर्निचर सुलभ किमतीत उपलब्ध तसेच वितरित करणे याकडे आमचे लक्ष आहे. हे सगळं करतानाच महत्त्वाचे म्हणजे गुणवत्ता आणि दीर्घकाळ टिकाऊपणा हे आमच्या ऑपरेशन्सचा गाभा राहील याची तरतूद करणे यावर आमचा भर आहे. डिझाइन, स्केल आणि अंमलबजावणीतील काटेकोरपणा यांचे हे समन्वयन इंटेरिओ बाय गोदरेजला आधुनिक भारतीय घरे तसेच कार्यालयांसाठी पसंतीचा ब्रँड म्हणून निश्चितच स्थान देईल.”
या रीब्रँडिंगच्या केंद्रस्थानी नवीन लोगोचे लाँचिंग आहे. गोदरेज इंटेरिओच्या आधुनिक, महत्त्वाकांक्षी आणि डिझाइन-नेतृत्वाखालील ब्रँड म्हणून होणाऱ्या परिवर्तनाची ती एक शक्तिशाली अभिव्यक्ती आहे. गोदरेजसारख्या आयकॉनिक मास्टरब्रँडकडून मिळालेला गुणवत्ता, विश्वास आणि टिकाऊपणा या मूल्यांच्या वारशावर तो आधारित आहे. यात कोरल हा रंग प्राधान्याने वापरलेला आहे. हा रंग आधुनिक भारताच्या उर्जेने प्रेरित आहे. तसेच तो सर्जनशीलता आणि इच्छांचे प्रतिबिंब दर्शवतो. या परिवर्तनासह, गोदरेजचा इंटेरियो हा केवळ फर्निचर ब्रँड राहत नाही तर आधुनिक भारताची जीवनशैली, कार्य आणि उत्साहाला आकार देण्यातही सहाय्यक ठरतो.
