Wednesday, May 20, 2026
BusinessLatest News

द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडने आपला पहिला फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला

मुंबई : द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड (पॅन्टोमॅथ ग्रुप कंपनी) यांनी आज त्यांच्या फ्लेक्सी कॅप फंड या नवीन फंड ऑफरिंगची (NFO) घोषणा केली. हा फंड लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप सेगमेंट्समध्ये असलेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे. द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडचे म्हणणे आहे की, ते गुंतवणूक करताना लवचिकता, वैज्ञानिक काटेकोरपणा आणि डिस्ट्रीब्युटर-फर्स्ट इकोसीस्टमवर विश्वास ठेवतात.

द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रात एक वेगळाच अनुभव आणत आहे. संस्थात्मक दर्जाचे संशोधन, खासगी इक्विटी शैलीतील काटेकोर तपासणी आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सहज उपलब्धता – या तिन्हींचा संगम घडविला आहे. द वेल्थ कंपनी फ्लेक्सी कॅप फंड हा खऱ्या अर्थाने लवचिकता (Agility) देणारा फंड आहे. तो बाजारातील मूलभूत घटक, मूल्यांकन आणि बाह्य परिस्थिती लक्षात घेऊन लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये गतिमान गुंतवणूक (Dynamic Allocation) करणार आहे.

“ही केवळ नावापुरती लवचिकता नाही. आम्ही ज्या प्रकारची काटेकोर तपासणी प्रायव्हेट इक्विटीमध्ये पाहिली जाते, तीच शिस्त आम्ही पब्लिक मार्केटमध्ये आणत आहोत. सखोल कंपनी व सेक्टर लेव्हल मूल्यांकनासोबतच मार्केट कॅप्समध्ये डायनॅमिक अलोकेशन यांचा संगम घडवून आणत आहोत. आमचे ध्येय म्हणजे ठाम विश्वास, स्पष्टता आणि जबाबदारीसह दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणे,” असे मधु लुनावत, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड यांनी सांगितले.

हा फंड दोन स्वतःच्या (प्रोप्रायटरी) गुंतवणूक फ्रेमवर्क्सवर आधारित आहे.

“आमचे गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान शिस्त आणि लवचिकतेचा सुंदर मिलाफ आहे. चेंज आणि एज यांसारख्या फ्रेमवर्क्सना प्रायव्हेट इक्विटी-शैलीतील तपासणीसोबत जोडून, आम्ही गुंतवणुकीच्या खऱ्या मार्गासारखे व्यवस्थापित जोखमीसह सातत्यपूर्ण परतावे देण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे अपर्णा शंकर, मुख्य गुंतवणूक अधिकारी – इक्विटी, द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड यांनी सांगितले.

पारंपरिक म्युच्युअल फंड धोरणे साधारणपणे बॅलन्सशीट विश्लेषणापर्यंतच मर्यादित राहतात. मात्र, द वेल्थ कंपनी प्रायव्हेट इक्विटीशैलीतील सखोल तपासणी करून अधिक खोलवर जात आहे:

  • प्रमोटरची भूमिका, उत्तराधिकारी नियोजनाची स्पष्टता आणि चॅनेल चेक्स
  • संभाव्य रेड फ्लॅग्स लवकर ओळखण्यासाठी फॉरेन्सिक व कायदेशीर ड्यू डिलिजन्स
  • स्वतःचे स्कोरिंग इंजिन्स, जे मूलभूत घटक, वाढीचे घटक आणि परिमाणात्मक संकेत (जसे अर्निंग्ज  प्राइस मोमेंटमअस्थिरता) यांचा संगम घडवतात
  • सतत निरीक्षणासाठी डायनॅमिक डॅशबोर्ड्स, ज्यामुळे वेळेवर हस्तक्षेप करून अपघात टाळणे शक्य होते

“आमच्या मते, वितरक हे भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगाचा कणा आहेत. त्यांना संस्थात्मक दर्जाची उत्पादने, सखोल संशोधन व जोखीम व्यवस्थापनाच्या आधारावर देणे, तसेच प्रभावी अंमलबजावणी आणि पारदर्शक सेवा याची खात्री करणे हेच आमचे ध्येय आहे,” असे देबाशीष मोहंती, चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर, द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड यांनी सांगितले.

द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडचे विकास मॉडेल वितरक आणि सल्लागार यांना केंद्रस्थानी ठेवून उभारले आहे. देशातील ११०+ शहरांमध्ये नेटवर्क आणि ४५०+ फ्रँचाईज पार्टनर्ससह, कंपनी वितरकांना सक्षम करण्यासाठी ट्रेनिंगडिजिटल ऑनबोर्डिंग आणि सुलभ प्रक्रिया यांमध्ये गुंतवणूक करत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading