अॅक्सिस बँकेकडून ‘पिंक कॅपिटल: द स्पेक्ट्रम ऑफ क्विअर मनी’ लाँच – LGBTQIA+ ग्राहकांच्या आर्थिक विश्वावर प्रकाशझोत
राष्ट्रीय : भारतातील अग्रगण्य खासगी बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने आज ‘पिंक कॅपिटल : द स्पेक्ट्रम ऑफ क्विअर मनी’ लाँच करण्याची घोषणा केली. या गुणात्मक अहवालात भारतातील LGBTQIA+ समुदायाचे आर्थिक आयाम आणि जीवनशैलीचा वेध घेण्यात आला आहे.
अहवालातील निष्कर्षांनुसार, क्विअर ग्राहक त्यांच्या खर्चात सर्वाधिक प्राधान्य सीस्टेमिक अॅक्सेस अँड इक्वॅलिटीला (34.2%) देतात. त्यानंतर, हेल्थकेअर व सुरक्षा (20%), आर्थिक सुरक्षितता व भविष्याची स्थिरता (18.6%), भावनिक व सामाजिक मान्यता (17.3%), तसेच लाइफस्टाईल व संस्कृती (10%) यांना स्थान आहे. या खर्च पद्धतीतून समुदायाचं जगणं, सन्मान आणि दीर्घकालीन स्थैर्य यांना दिलेले महत्त्व स्पष्ट होते. विशेष म्हणजे, मानसिक आरोग्यसेवा आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी या दोन मुद्द्यांवर समुदायाने खास भर दिल्याचे आढळून आले.
अहवालातील इतर निष्कर्षांनुसार, क्विअर ग्राहकांचा कल अशा ब्रँड्सकडे वाढताना दिसतो, जे ठोस आणि सर्वसमावेशक उपाय देतात. यात जॉइंट अकाउंट्स, पेन्शन सुविधा आणि हेल्थकेअर बेनिफिट्स यांचा विशेष समावेश आहे. केवळ इन्क्लुझिव्ह ब्रँडिंगवर मर्यादित राहण्यापेक्षा दैनंदिन जीवनातील व्यवहारात दिसणारी समावेशकता समुदायात दीर्घकालीन विश्वास आणि निष्ठा निर्माण करते, असे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे.
आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यकालीन स्थैर्य या संदर्भात दोन टोकाचे दृष्टिकोन समोर आले. तरुण पिढी बँका आणि शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थी कर्ज, शिष्यवृत्ती, तसेच क्विअर-केंद्रित बचत किंवा निवृत्तीवेतन उत्पादने यांची अपेक्षा करते. दुसरीकडे, वृद्ध पिढीला कम्युनिटी हाउसिंग मॉडेल्स आणि क्विअर-अफर्मिंग रिटायरमेंट होम्सची तीव्र गरज जाणवते.
“गेल्या काही वर्षांत अॅक्सिस बँकेने ‘Mx’ या सन्मानजनक मार्करखाली किंवा ट्रान्सजेंडर व्यक्तींनी उघडलेल्या हजारो खात्यांचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले आहे. हे वाढत्या विश्वासाचे, समुदायाशी अधिक दृढ नात्याचे आणि स्वतंत्र, तसेच अधिकाधिक दृश्यमान होत असलेल्या ग्राहकवर्गाच्या उदयाचे प्रतीक आहे,” असे मुनीश शारदा, एक्ज़िक्युटिव डायरेक्टर, अॅक्सिस बँक यांनी सांगितले.
या प्रगतीवर पुढे काम करताना, अॅक्सिस बँक आता समावेशक बँकिंगला नवे परिमाण देत आहे. या अहवालाद्वारे बँक LGBTQIA+ समुदायाच्या आर्थिक वास्तव आणि आकांक्षा उलगडून दाखवत आहे.
“पिंक कॅपिटल सर्वांसमोर आणून आम्ही फक्त योग्य तेच करत नाहीये, तर भारतातील समावेशक वित्तीय व्यवस्थेचे भविष्य घडवत आहोत,” असे राजकमल वेंपटी, ग्रुप एक्झिक्युटिव्ह व प्रमुख, ह्यूमन रिसोर्स, अॅक्सिस बँक यांनी सांगितले.
हा अहवाल अॅक्सिस बँकेच्या व्यापक ESG आणि DE&I अजेंड्याचा एक भाग आहे. 2021 मध्ये सुरू केलेल्या #ComeAsYouAre चार्टरमुळे हा अजेंडा अधिक बळकट झाला. या चार्टरअंतर्गत LGBTQIA+ समुदायातील कर्मचारी आणि ग्राहकांसाठी समावेशक धोरणे व पद्धती राबविण्यात आल्या. यात समलिंगी भागीदारांसाठी जॉइंट सेव्हिंग्स आणि टर्म डिपॉझिट अकाउंट्स, भागीदारांसाठी नॉमिनेशन सुविधा, तसेच विविध लिंग ओळख असलेल्या ग्राहकांसाठी Mr किंवा Ms ऐवजी Mx या सन्मानजनक शब्दाचा वापर, यांचा समावेश आहे. बँक ग्राहकांच्या गोपनीयतेचा आदर राखून समावेशक प्रवेशासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळेच समलिंगी भागीदारांची स्वतंत्र माहिती गोळा न करण्याची पद्धत बँकेने अवलंबली आहे.
“पिंक कॅपिटल अशा आवाजांना व्यासपीठ देतो, जे आजवर आर्थिक चर्चेतून दूर ठेवले गेले होते,” असे हरीश अय्यर, एसवीपी आणि हेड – DE&I, अॅक्सिस बँक यांनी सांगितले.
या लाँचची वेळ विशेष महत्त्वाची आहे, कारण ती सर्वोच्च न्यायालयाच्या कलम 377 वरील ऐतिहासिक निकालाच्या सातव्या वर्धापन दिनाशी साधर्म्य साधते. या निकालाने LGBTQIA+ समुदायाला प्रतिष्ठा आणि स्वतःची ओळख जपण्याचा हक्क पुन्हा अधोरेखित केला होता. हा अहवाल ‘स्पर्श वीक’ दरम्यान सादर करण्यात आला, अॅक्सिस बँकेचा संस्कृती व ग्राहकांना समर्पित प्रमुख उत्सव. या निमित्ताने बँकेने आपल्या सेवा, समावेशकता आणि ग्राहक-केंद्रिततेच्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली.
