… म्हणून लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे बंद करू का?
अजित पवार यांनी घेतली द्राक्ष बागायतदारांची फिरकी
पुणे: प्रतिनिधी
तुम्हाला द्राक्षाच्या बागेत कामाला मजूर मिळत नाहीत म्हणून मी लाडक्या बहिणींना पैसे देणे बंद करू का, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनात फिरकी घेतली.
लाडकी बहीण योजनेबद्दल सतत चर्चा सुरू आहे. या योजनेच्या निधीबाबत शंका कुशंका काढल्या जात आहेत. मी याबाबत महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याशी बोलणार आहे. अनेक नको त्या मंडळींनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना सगळ्यांना शोधून काढावे लागणार आहे. मी या योजनेवर बैठक घेणार आहे, असेही पवार म्हणाले.
… म्हणून द्राक्ष बागायतदारांच्या पाठीशी उभे राहू
माझ्या कुटुंबात माझ्या जन्माच्या आधीपासून द्राक्षांची शेती केली जाते. माझ्या आजोबांपासून सगळे जण बागायतदार संघाचे सदस्य आहोत. त्यामुळे मी आधी द्राक्ष बागायतदार आणि नंतर कृषिमंत्री आहे. त्यामुळे मला द्राक्ष बागायतदारांच्या समस्यांची जाण आहे. सरकार म्हणून आपण कायम द्राक्ष बागायतदारांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही दत्ता भरणे यांनी दिली.
