Friday, April 3, 2026
BusinessLatest News

क्रोमा कात्रज स्टोरची पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्टोरमध्ये मिळवा ७%* ची फ्लॅट सूट

पुणे: भारतातील सर्वात विश्वासार्ह ओम्नीचॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा परिवारातील एक सदस्य क्रोमा पुण्यातील त्यांच्या कात्रज स्टोअरला पाच वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. गेल्या पाच वर्षांत, क्रोमा कात्रजने आजूबाजूच्या परिसरातील कुटुंबे, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी प्रगत तंत्रज्ञान, तज्ञ मार्गदर्शन आणि  विश्वासार्ह सेवेचे एक पसंतीचे केंद्र म्हणून ओळख निर्माण केली आहे.

पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, पुण्यातील क्रोमा कात्रज स्टोअर १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२५ दरम्यान वर्धापन दिन सोहळा आयोजित करत आहे. पुण्यात २२ आणि महाराष्ट्रात १०६ स्टोअर्ससह, क्रोमा राज्यभरातील ग्राहकांच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

क्रोमा कात्रज स्टोअर्सच्या वर्धापनदिनाच्या ऑफरचा लाभ घ्या:

  • १५,०००/- आणि त्याहून अधिक किमतीच्या खरेदीवर त्वरित सवलत*
  • विविध घरगुती आणि स्वयंपाकघरातील उपकरणांवर विशेष डील
  • ऑफरयावर लागू:

o  टीव्हीसाउंडबार आणि होम थिएटरसह घरगुती मनोरंजन प्रणाली

इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, “या पाच वर्षांत, आमचे कात्रज स्टोअर स्मार्टफोन आणि लॅपटॉपपासून ते घरगुती उपकरणे आणि मनोरंजनापर्यंत प्रत्येक तंत्रज्ञानविषयक  गरजांसाठी वनस्टॉप डेस्टिनेशन बनले आहे. आमचा प्रत्यक्ष अनुभव, पारदर्शक सल्ला आणि विक्रीनंतरच्या खात्रीशीर, विश्वासार्ह सेवा हे आमच्या ग्राहकांना अपेक्षित असलेले वैशिष्ट्य आहे. पाचव्या वर्धापनदिनानिमित्त, आम्ही आकर्षक डील आणि एक अखंड, चिंता-मुक्त खरेदी अनुभवासह हे वचन पूर्ण करत असल्याचा आनंद साजरा करत आहोत.”

क्रोमा कात्रज स्टोअर आठवड्याचे ७ दिवस, सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत उघडे असते. तज्ञ कर्मचारी आणि प्रत्येक ग्राहकाच्या गरजा समजून घेणारी वैयक्तिक सेवा यांच्यासह प्रत्यक्ष तंत्रज्ञानाचा अनुभव देते. २००+ शहरांमध्ये ५६० हून अधिक स्टोअर्सच्या नेटवर्कसह, ५५० हून अधिक आघाडीच्या ब्रँड्सच्या १६,००० हून अधिक तंत्रज्ञान उत्पादनांसाठी क्रोमा हे भारतीयांचे पसंतीचे ठिकाण आहे.

*ऑफर केवळ पुण्यातील कात्रज स्टोअरसाठी आहेत आणि इतर कूपनसह एकत्रित केल्या जाऊ शकत नाहीत. या ऑफर अ‍ॅपल उत्पादने, डायसन डिव्हाइसेस किंवा गुगल, वनप्लस आणि नथिंगच्या स्मार्टफोनवर लागू नाहीत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading