Sunday, May 24, 2026
Latest NewsSports

Mother Teresa Cup : ॲस्पायर एफसी संघाला विजेतेपद !!

पुणे :  पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए), सहायिनी आणि ऑस्किलियम वेल्फेअर सेंटर, पुणे व सेलेशियन को-ऑपरेटर्स येरवडा युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या ‌‘मदर तेरेसा करंडक‌’ महिला फुटबॉल स्पर्धेत ॲस्पायर एफसी अ संघाने ॲस्पायर एफसी ब संघाचा १-० असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

डॉन बॉस्को युथ सेंटर मैदानावर शनिवार आणि रविवार रोजी झालेल्या या स्पर्धेत आठ महिला संघांनी सहभाग घेतला होता. सिग्मा एफसी, युबीएसए एफसी, ॲस्पायर एफसी अ आणि ब, गो स्पोर्ट्‌‍स एफसी, बिशप उंद्री एफसी, इग्नाईट एफसी, रायन एफसी हे संघ विजेतेपदासाठी झुंझले होते. ‌‘बेटी सुरक्षा‌’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पीडीएफएच्या संलग्न असलेल्या संघांनी भाग घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली. अत्यंत चुरशीचा आणि अतितटीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये ॲस्पायर अ संघाने ॲस्पायर ब संघाचा १-० अशा निसटत्या फरकाने विजय मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

अंतिम सामन्यात १३ व्या मिनिटाला लावण्या कुमारी हिने ओवी जी. हिने दिलेल्या अप्रतिम पासच्या सहाय्याने गोल नोंदविला. १-० अशी आघाडी मिळवल्यानंतर ॲस्पायर अ संघाने सामन्यात बचाव भक्कम करून आपली आघाडी कायम राखली. ॲस्पायर ब संघानेही आपल्या खेळील नैपुण्य आणि प्रतिभा सिद्ध केली. या संघातील पूजा गुप्ता, रितिका सिंग आणि जिग्मेट चौझेन अशा नामांकित खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. एसएएफएफ महिला फुटसाल अजिंक्यपद स्पर्धेतभारतीय महिला फुटसाल संघाने या तीन खेळाडूंनी प्रतिनिधीत्व केले आहे. या अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीमुळे अंतिम सामना अधिक रंजक आणि स्पर्धात्मक झाला. ॲस्पायर ब संघाने अत्यंत जिगरबाज खेळ केला परंतु ॲस्पायर अ संघाने संयम कायम राखत विजयश्री खेचून आणली.

मदर तेरेसा करंडकाचा हा दुसरा हंगाम अत्यंय सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. स्पर्धेने केवळ महिला फुटबॉललाच प्रोत्साहन दिले नाही तर, एका महत्वपूर्ण सामाजिक उद्देशालाही भक्कम पाठिंबा दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading