Monday, May 25, 2026
BusinessLatest News

सिग्नेचर ग्लोबलच्या शेअरमध्ये ६० टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेडने केलेल्या दमदार कामगिरीनंतर अॅक्सिस कॅपिटलआयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मनी कंपनीचे शेअर विकत घेण्याची शिफारस केली आहे.

अॅक्सिस कॅपिटलने १,७८० रुपयांच्या लक्ष्यित किंमतीसह बाय (खरेदी करा) ही रेटिंग कायम ठेवली आहेतर मोतीलाल ओसवाल आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीजने अनुक्रमे १,७६० आणि १,७४२ रुपयांच्या लक्ष्यित किमती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे समभागांच्या किमतीमध्ये ६० टक्क्यांपर्यंत वाढ सूचित होत आहे.

सिग्नेचर ग्लोबलच्या शेअरची किंमत ११ ऑगस्ट २०२५ रोजी सुरूवातीच्या सौद्यांच्या वेळेस १,१४७.८० रुपयांवरून सुरू झाली.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर दुपटीने वाढून ८७० कोटी रुपयांवर पोहोचला. त्यामागे कंपनीने केलेली १४ लाख चौ. फुटांची डिलिव्हरी तर करोत्तर नफा पाचपटीने वाढून ३४.४ कोटी रुपयांवर पोहोचण्याची चालना होती.

अॅक्सिस कॅपिटलने बाय रेटिंग कायम ठेवली आहे आणि १,७८० रुपयांची लक्ष्यित किंमत कायम ठेवली आहे. त्यातून शेअरची किंमत ६० टक्क्याने वाढण्याचे सूचित करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २१-२५ मध्ये सिग्नेचर ग्लोबलने ५७ टक्के सीएजीआर विक्री नोंदणी केली आहेत्यात मुख्यतः परवडणाऱ्या / मध्य-उत्पन्न हाऊसिंग प्रकल्पाचा समावेश होताअसे या फर्मने नमूद केले आहे.

आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीतसिग्नेचर ग्लोबलने २,६४० कोटी रुपयांची विक्री बुकिंग केली आहे आणि आर्थिक वर्ष २६ साठी १२,५०० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यातून २० टक्के वाढीचे प्रतिबिंब पडले असून कंपनीने मध्यम कालावधीत २० टक्के सीएजीआर राखण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

मोतीलाल ओसवालने शेअरच्या किमतीत ५८ टक्के वाढीची अपेक्षा ठेवली असून तिसऱ्या व चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या वसुलीमध्ये झपाट्याने सुधारणा होण्याची अपेक्षा आहेअसे म्हटले आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ने सुद्धा प्रति शेअर १,७४२ रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह त्यांचे खरेदी रेटिंग कायम ठेवले असून ५७ टक्के वाढीची शक्यता त्यातून दिसून येते.

आर्थिक वर्ष २५-२८ साठी ४५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्प पाइपलाइनसहसिग्नेचर ग्लोबल आर्थिक वर्ष २६ आणि आर्थिक वर्ष २७ मध्ये अनुक्रमे १३,००० कोटी रुपये आणि १४,७०० कोटी रुपयांचे विक्री बुकिंग साध्य करेल अशी अपेक्षा आयसीआयसीआय सिक्युरिटीजने व्यक्त केली आहे.

कंपनीला गुरुग्राममधील तिच्या स्थापित बाजारपेठेबाहेर डायव्हर्सिफिकेशनची संधी दिसत असून ती कोणत्याही नवीन धोरणात्मक चौकटीची आतुरतेने वाट पाहत आहे. यामुळे नवी दिल्लीएनसीआर शहरात अनेक क्षेत्रे उघडतील जिथे ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट शक्य आहे,” असे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.

सिग्नेचरचे व्यवसाय मॉडेल अद्वितीय आहे. कंपनी जमीन एकत्रित करण्याचे काम करत नाहीत्याऐवजीती ४-५ वर्षांच्या आत प्रकल्प सुरू करण्यावर आणि पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करते. ती वाढ करण्यासाठी अतिरिक्त रक्कम पुन्हा गुंतविते आणि कोणत्याही वेळी ४-५ वर्षांसाठी पुरेशा जमिनीचा साठा राखीव ठेवतेअसे ब्रोकरेज फर्मने नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading