Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

१७ ऑगस्ट रोजी ‘उगम’ या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे  : सुप्रसिद्ध संवादिनीवादक तन्मय देवचके यांच्या स्वरानुजा या म्युझिक अकादमीच्या वतीने रविवार दि. १७ ऑगस्ट रोजी ‘उगम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उगम या कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष असून टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात सकाळी १० वाजत सदर कार्यक्रम संपन्न होईल. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.
‘उगम’ या कार्यक्रमाची सुरुवात तन्मय देवचके यांकडून संवादिनीवादनाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विशेष सादरीकरणाने होईल. तन्मय यांचे विद्यार्थी जगभरात विविध ठिकाणी असून यावेळी यातील निवडक शिष्य उपस्थितांसमोर आपले संवादिनीवादन सादर करतील. त्यामध्ये यांचे ज्येष्ठ विद्यार्थी निलय सालवी व अथर्व कुलकर्णी हे देखील यावर्षी सोलो संवादिनी वादन सादर करणार आहेत. त्यांना अनीश थत्ते हे तबल्याची साथ करतील.

स्वतः तन्मय देवचके यांच्या संवादिनी वादनाने कार्यक्रमाचा समारोप होईल. यावेळी त्यांच्या एकल संवादिनीवादनाला सोहम गोराणे (तबला) आणि रोहित खवळे (पखवाज) हे साथसंगत करतील. स्वरानुजा अकादमीचे छोटे दोस्त सृजन देवचके व अन्वी पाटणकर हे सूत्रसंचालन करत कार्यक्रम आणखी रंजक करतील.

तन्मय यांचे आजोबा गोपाळ देवचके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या श्री गोपाळ देवचके शिष्यवृत्तीचे  हे सलग दुसरे वर्ष असून संवादिनी विषयात गती असणाऱ्या गरजू आश्वासक संवादिनीवादकाला ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. यावर्षी सावनी जोशी या विद्यार्थीनीला ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल अशी माहिती, तन्मय देवचके यांनी कळविली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading