Wednesday, May 20, 2026
BusinessLatest News

एनपीसीआय आणि आयडीआरबीटी यांच्यात पेमेंट व सायबर सुरक्षा क्षेत्रात आधुनिक सुविधा आणण्यासाठी सामंजस्य करार

मुंबई :  नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि द इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नोलॉजी (आयडीआरबीटी) यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाला असून त्याद्वारे भारतभरातील डिजिटल पेमेंट क्षेत्रातील सायबर सुरक्षा आणखी मजबूत करण्याचे ध्येय आहे.

या कराराचा भाग म्हणून दोन्ही कंपन्यातर्फे एकत्रितपणे बँकिंग व डिजिटल पेमेंट्स सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजित केले जाणार आहेत. या प्रोग्रॅमअंतर्गत सायबर सुरक्षा, मजबूत पायाभूत सुविधा आणि माहितीची गोपनीयता अशा महत्त्वाच्या घटकांवर भर दिला जाईल. या भागिदारीच्या माध्यमातून एनसीपीआय सर्टिफाइड पेमेंट सिक्युरिटी सर्टिफिकेशन प्रोग्रॅमही सुरू केला जाणार असून तो या उद्योगक्षेत्राच्या नव्या गरजा तसेच नियामक अपेक्षांशी सुसंगत असेल. आयडीआरबीटीद्वारे सचेत (IBCART 3.0) ही थ्रेट इंटेलिजन्स सेवा एनपीसीआय तसेच या क्षेत्रातील इतर भागिदारांना पुरवली जाणार आहे.

एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप आस्बे म्हणाले, ‘पेमेंट आणि सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी आयडीआरबीटीबरोबर भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. सायबर सुरक्षा मजबूत करणं हे फक्त तंत्रज्ञानापुरतं मर्यादित नसतं, तर त्याचा लोकांशी आणि पूर्वतयारीशी खोलवर संबंध असतो. आयडीआरबीटीद्वारे भागिदारीत प्रशिक्षण, सर्टिफिकेट आणि थ्रेट इंटेलिजन्स यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा तयार केली जाणार आहे. या भागिदारीमुळे एनपीसीआयची जोखीमपूर्व व्यवस्थापनाप्रती असलेली बांधिलकी तसेच डिजिटल पेमेंट क्षेत्रातील सुरक्षा वाढवण्याची क्षमता दिसून आली आहे.’

आयडीआरबीटीचे संचालक डॉ. दीपक कुमार यांनी आयडीआरबीटीची स्थापना बँकिंग व आर्थिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब करून ते रूजवण्यासाठी केल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे ध्येयही त्यामागे होते. एनपीसीआयबरोबर भागिदारीची औपचारिकता पूर्ण झाल्यावर ते म्हणाले, ‘यामुळे सुरक्षा, क्षमता उभारणी व सक्रिय प्रतिसादाची संस्कृती विस्तारेल आणि पर्यायाने अधिक व्यापक पेमेंट यंत्रणा मजबूत होण्यास मदत होईल. सचेत (IBCART 3.0) सबस्क्रिप्शनमुळे एनपीसीआयबरोबर काम करत असलेल्या कंपन्यांना वैविध्यपूर्ण, समृद्ध आणि संबंधित विषयांनुसार थ्रेट इंटेलिजन्स सेवा मिळेल. यामुळे एकंदर यंत्रणेची ताकद वाढवण्यास मदत होईल.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading