Wednesday, May 20, 2026
ENTERTAINMENTLatest News

“वॉर २ मध्ये एनटीआर ला मानव मशीनसारखा दाखवणं गरजेचं होतं!” – अनाइता श्रॉफ अदजानिया

 

War 2 चा टीझर जाहीर झाल्यानंतर NTR चं रुबाबदार आणि प्रभावी लुक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्यांच्या स्टाईलचं सर्वत्र कौतुक होत आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या कॉस्ट्युम डिझायनर अनाइता श्रॉफ अदजानिया यांनी सांगितलं की, देशभरातून NTR च्या लुकवर प्रेम मिळालं, हे पाहून त्या भारावून गेल्या आहेत.

भारताच्या आघाडीच्या स्टायलिस्ट असलेल्या अनैताने सांगितलं, “वॉर 2 साठी एनटीआर सोबत काम करणं ही एक नवीन आणि आनंददायक अनुभव होता. तो खोलीत पाऊल टाकतो आणि क्षणात वातावरणात ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा शांत पण प्रभावी असते. त्याच्या स्माईलमध्ये उब आहे आणि त्याच्यात एक आत्मविश्वास आहे, जो त्याच्या भूमिकेत स्पष्टपणे दिसतो.”

ती पुढे म्हणाली, “एनटीआर चा लुक रिअल ठेवायचा होता, पण त्याचं बळ आणि मर्दानी रूपसुद्धा ठळकपणे दिसावं असं मला वाटलं. त्याची उपस्थिती एकदम रॉ आणि स्ट्रॉंग वाटते – जणू काही उद्दिष्ट साधणारी एक मानव मशीन. त्यामुळे त्याचा वॉर्डरोब साधा पण प्रभावी होता – लेदर जॅकेट्स, रग्ड पोशाख आणि ठळक आऊटलाईन.”

अनाइता ने असंही स्पष्ट केलं की, “त्याच्या स्टाईलमध्ये काहीही फाजील नाही. सरळ, थेट आणि प्रभावी – अगदी तसाच आहे एनटीआर चा लुक.”

वॉर २ हा चित्रपट आदित्य चोप्रा यांनी निर्मित केला आहे आणि अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात ‘मॅन ऑफ द मासेस’ म्हणून ओळखला जाणारा एनटीआर, ऋतिक रोशनच्या समोर दिसणार आहे. कियारा अडवाणी ही प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. War २ , १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading