एअरटेल सादर करत आहे प्रीपेड वापरकर्त्यांसाठी भारतातील पहिले ऑल-इन-वन ओ.टी.टी मनोरंजनाचे पॅक्स
पुणे: भारती एअरटेल (“एअरटेल”) ही भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा पुरवठादारांपैकी एक आहे आणि आज तिने प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन अप्रतिम मनोरंजनाचे पॅक्स जाहीर केले आहेत. एअरटेलकडे 25+ सर्वोत्तम ओ.टी.टी प्लॅटफॉर्म्सचा औद्योगिक अग्रणी पोर्टफोलिओ उपलब्ध असून त्यात नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार, झी5 आणि सोनीलिव्ह सामील आहेत आणि ती अशी विस्तृत मनोरंजन अनुभव प्रदान करणारी भारतातील एकमेव टेलिकॉम कंपनी आहे. प्रास्तविक आकर्षक किंमत 1 महिन्याच्या वैधतेसाठी ₹279 पासून सुरू होऊन ग्राहकांना विविध लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होणार आहेत ज्याचे मूल्य ₹750 एवढे आहे आणि त्यायोगे ती अशी एकमेव टेलिकॉम कंपनी बनलेली आहे जिच्याकडे ओ.टी.टी स्ट्रीमिंग पर्यायांची एवढी विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. कंपनीने अनलिमिटेड 5जी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स सोबत ₹598 मध्ये मनोरंजन पॅक्स सुद्धा एकत्रित केले असून असीमित मनोरंजनाची सुविधा पुरवित आहे.
| पॅक्स | फायदा | वैधता | एमआरपी |
| एअरटेल एक्सट्रीम प्ले ॲपद्वारे थेट सब्सक्रिप्शन | नेटफ्लिक्स बेसिक + झी5 + जिओ हॉटस्टार + एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियम | 1 महिना | ₹ 279 |
| फक्त प्रीपेड सामग्रीचे पॅक्स (1 महिन्यासाठी 1जीबी डेटा सामील आहे) | नेटफ्लिक्स बेसिक + झी5 + जिओहॉटस्टार + एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियम | 1 महिना | ₹ 279 |
| प्रीपेड डेटा बंडल्स (अनलिमिटेड 5जी आणि अनलिमिटेड कॉल्स) | नेटफ्लिक्स बेसिक + झी5 + जिओहॉटस्टार + एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियम | 28 दिवस | ₹ 598 |
| नेटफ्लिक्स बेसिक + झी5 + जिओहॉटस्टार + एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियम | 84 दिवस | ₹ 1729 |
एकच पॅक घेऊन ग्राहक आता अग्रगण्य ओ.टी.टी प्लॅटफॉर्म्स वरून विविध प्रकारचे टीव्ही शोज, हिट चित्रपट आणि माहितीपट (डॉक्युमेंटरीज) पाहू शकतील. इतरांमध्ये या अग्रगण्य ओ.टी.टी प्लॅटफॉर्म्स मध्ये सामील आहेत – नेटफ्लिक्स, जिओहोस्टार, झी5, सोनीलिव्ह, लायन्सगेटप्ले, ए.एच.ए, सननेक्स्ट, हॉईकॉई, इरोसनाऊ आणि शेमारूमे. कंपनीने या विविध ओ.टी.टी सेवांना एका परवडणाऱ्या पॅकेजमध्ये एकत्र केलेले आहे आणि आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांच्या बदलत जाणाऱ्या मनोरंजनाच्या आवडीनिवडी पूर्ण करण्याचा प्रयत्नात आहे. हे त्यांना 16 हून अधिक भाषांमध्ये आंतरराष्ट्रीय, बॉलीवूड आणि प्रादेशिक सामग्री, ज्यात त्यांना आवडणारे शो, चित्रपट आणि मूळ सामग्री सामील आहे, यांचा आनंद सहजपणे घेऊ देत आहे आणि व्यक्तिगत सबस्क्रिप्शन व्यवस्थापित करण्याची गुंतागुंत त्यात सामील नाही. एअरटेलचे मूल्य प्रस्ताव या धोरणात्मक उपक्रमातून वाढण्यासोबतच आपल्या ग्राहकांना अजोड सुविधा, लवचिकता आणि विविध प्रकारचे मनोरंजन पर्याय प्रदान करण्यासाठी कंपनीच्या समर्पणाकडे अधिक लक्ष वेधून घेतले जात आहे.
