Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राहुलजीं कडून सेनेचा अपमान वा सेनेवर अविश्वास कसा.. (?) ते फडणवीसांनी सांगावे..! – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे दि : नागपूर येथील ‘भारतीय सैन्याप्रती’ कृतज्ञता व गौरवपर निघालेल्या भाजपच्या ‘तिरंगा रॅलीच्या समारोप प्रसंगी ‘सैन्यातील शहीद जवानांना व हल्ल्यातील मृत नागरिकांना’ श्रद्धांजली वहाण्याच्या कार्यक्रमात बोलतांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली सभेचे संकेत व गांभीर्य पायदळी तुडवून त्यांचा राजकीय आखाडा केला व काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा राहुलजी गांधी यांचे वर आधारहीन राजकीय आरोप करण्याचा निंद्य व दुर्दैवी प्रयत्न केल्याचा निषेध व्यक्त करून, काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी “विरोधी पक्ष नेते राहूलजी गांधी यांनी सेनेचा अपमान कश्या प्रकारे केला” ते देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री फडणवीसांनी, आपण संविधानीक पदा’ चे भान राखून जबाबदारीने बोलावे नाहक आधारहीन, तथ्य – हीन, खोटे व बालीश आरोप करू नयेत व आपल्या मुख्यमंत्री पदाचे गांभीर्य जपावे असे ही राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
आपल्या ‘प्रसिद्धी निवेदनात’ ते म्हणाले की,
पहेलगाम हल्ल्या नंतर काँग्रेस कार्यकारिणी ची बैठक घेऊन, विरोधी पक्षासह केंद्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची, देशाच्या ऐक्याप्रती निग्रहाची व सामंजस्याची भुमिका मा राहुलजी गांधी यांनी घेतली.
मात्र, ‘दहशतवादी केंद्रांवरील सेनेच्या हल्लयांची’ विदेश मंत्र्यांकडून… ‘पाकिस्तानाला पुर्व सुचना’ देणे हे कोणते नैतिक वा मुत्सद्दी शहाणपण आहे (?) याचा जाब स्वपक्षाच्या केंद्र सरकार’ला फडणवीसांनी अगोदर विचारावा व ही सरकार पुरस्कृत देशद्रोहाची कृती आहे काय (?) हे देखील तपासावे..!
देशाप्रती समर्पित ‘भारतीय सेनेच्या ‘ध्येयवादी जीवनाच्या करीअर’ला ४ वर्षांच्या अग्निवीर योजनेच्या ठेकेदारीत अडकवण्या विरोधात, काँग्रेसनेते राहूलजी गांधी यांच्या लढ्याचे श्रेय मनात बोचत असल्याने भाजप नेत्यांची राहुलजी विरोधात तथ्य वा आधारहीन टिका करण्याचा प्रयत्न निंदनीय आहे.
२०१४ नंतरचा अनुभव लक्षात घेऊनच देशातील जनतेने काँग्रेस पक्षाची भुमिका, वाटचाल पाहून काँग्रेसच्या संसदेतील जागा दुप्पट वाढवून राहुलजी गांधी यांना संविधानीक ‘विरोधी पक्षनेते’ पदी बसवले याचे ऊचीत भान देखील भाजप नेत्यांनी ठेवावे.
काँग्रेस पक्षाची तिरंग्याप्रती आत्मियता स्वातंत्र्य लढ्यापासूनची आहे ती २००५ नंतरची नव्हे अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading