Sunday, May 31, 2026
Latest NewsPUNE

पिंपळे गुरवच्या जयभीम चौकात उद्या भीम जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन

 

पिंपरी  : पिंपळे गुरव येथील गुरु शोभा सामाजिक संस्था, आदियाल स्पोर्ट्स क्लब, बुद्धभूषण सेवा संघ, 125 वी संयुक्त जयंती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भीम जल्लोष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

हा कार्यक्रम गुरवार, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ०७.०० वाजता पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक नजिक जय भीम चौक येथे होणार आहे. या कार्यक्रमात पार्श्वगायक मी होणार सुपरस्टार फेम छोटे वस्ताद सार्थक शिंदे, सारेगमप लिटल चॅम्प्स फायनलिस्ट हास्य जत्रेतील कलाकार मोनल कडलक यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाताई मानसिंग आदियाल आणि युवा नेते अमरसिंग आदियाल यांनी केले आहे. 

या कार्यक्रमाला माजी आमदार अश्विनी जगताप, आमदार शंकर जगताप, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आयुष्यमान भारत व आयुष्यमान वय वंदना कार्ड मोफत शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती अमरसिंह आदियाल यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading