एकेआयच्या PIMSE मध्ये फ्रान्सच्या साउथ आशिया एरिया मॅनेजर मॉड ले बार्स याची भेट
पुणे : एकेआयच्या पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अॅण्ड आंत्रप्रेन्युअरशिप (PIMSE) मध्ये फ्रान्सच्या साउथ आशिया एरिया मॅनेजर सौ. मॉड ले बार्स यांचे स्वागत करण्यात आले. ही भेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.
ले बार्स यांनी संचालिका डॉ. पोरिनिता बॅनर्जी, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांशी सखोल संवाद साधला. यामध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांची आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण, दुहेरी पदवी कार्यक्रम आणि जागतिक स्तरावरील इंडस्ट्री इंटिग्रेटेड शिक्षण संधी यासंबंधी चर्चा झाली.
त्यांच्या प्रेरणादायी संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय करिअर संधींबाबत जागरूकता निर्माण झाली आणि जागतिक दृष्टिकोनातून विचार करण्याची प्रेरणा मिळाली. पीआयएमएसईचा उद्देश जागतिक स्तरावरील शैक्षणिक भागीदारी निर्माण करणे व विद्यार्थ्यांना व्यापक दृष्टिकोन देणे हाच आहे.
