Saturday, May 30, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

ड्रिंक करता? मग नाकारला जाऊ शकतो क्लेम

नवी दिल्ली: प्रतिनिधी

विमा पॉलिसी घेताना मद्यपान अथवा अमली पदार्थ सेवनाची सवय अथवा व्यसन असल्याचे लपविल्यास आणि त्या कारणाने पॉलिसीधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम नाकारण्याचा अधिकार विमा कंपनीला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने अधोरेखित झाले आहे.

एका व्यक्तीने लाईफ इन्शुरन्स ऑफ इंडियाकडून जीवन आरोग्य विमा पॉलिसी घेतली. या पॉलिसीनुसार पॉलिसीधारकाला रुग्णालयात दाखल केल्यास प्रतिदिन एक हजार व अतिदक्षता विभागात दाखल केल्यास प्रतिदिन दोन हजार रुपये दिले जातात.

संबंधित पॉलिसीधारक व्यक्तीने पॉलिसी घेतल्यानंतर एक वर्षाने पोटदुखीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर महिन्याभरात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने एलआयसीकडे विम्याच्या रकमेची मागणी केली. कंपनीने नियम 7(11) च्या आधारे रक्कम देण्यास नकार दिला. जीवन आरोग्य पॉलिसीचे या नियमानुसार मद्य अथवा अमली पदार्थांच्या सेवनामुळे उद्भवणाऱ्या आजारांसाठी या विमा संरक्षण मिळत नाही.

संबंधित मृत व्यक्तीच्या पत्नीने ग्राहक मंचाकडे धाव घेतली. ग्राहक मंचाने विम्याची रक्कम देण्याचे आदेश दिले. कंपनीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने कंपनीची बाजू ग्राह्य मानून मद्य अथवा अमली पदार्थांच्या सेवनामुळे उद्भवणाऱ्या आजारांसाठी विमा रक्कम नाकारण्याचा अधिकार अधोरेखित केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading