Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

महर्षी वेदोद्धारक फाऊंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न

पुणे  : पुण्यातील महर्षी वेदोद्धारक फाऊंडेशनच्या वतीने नुकतेच मावळ येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी वहानगाव- मावळमधील तब्बल ३०० नागरिकांची आरोग्य तपासणी करीत त्यांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप केले. महर्षी वेदोद्धारक फाऊंडेशन ही संस्था गेले अनेक वर्षे सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेली संस्था असून संस्थेच्या माध्यमातून वर्षभर अनेक समाजपयोगी उपक्रम हाती घेतले जातात. वहानगाव मावळ येथे झालेल्या या आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading