पुणे मराठी टोस्मास्टर्स तर्फे आयोजित कथा कथन स्पर्धा २०२५ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : टोस्टमास्टर्स डिस्ट्रीक्ट 125 चा उपक्रम असलेल्या पुणे मराठी टोस्मास्टर्स मंडळातर्फे आयोजित “कथा कथन स्पर्धा २०२५” ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.भाऊ इन्स्टिट्यूट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत टोस्मास्टर्स सदस्य गट आणि अतिथी (पाहुणे) गट अशा दोन वेगवेगळ्या गटांमध्ये एकूण २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला.टोस्मास्टर्स इंटरनॅशनलच्या तत्वांनुसार आत्मविश्वास आणि प्रभावी सादरीकरणाला चालना देणारा हा कार्यक्रम ठरला.
सदस्य नसलेल्या स्पर्धकांच्या (नॉन टोस्टमास्टर्स ) गटात रश्मी पापळकर यांनी प्रथम क्रमांक, सुचेता ढेब्री यांनी द्वितीय क्रमांक तर वेदिका फडके यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्रिया मराठे व चित्रा मसलेकर यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.
टोस्मास्टर्स गटात चिन्मय भुर्के यांनी प्रथम क्रमांक, निलेश पाटणकर यांनी द्वितीय क्रमांक तर कृष्णप्रसाद परळीकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. नागेश गुरुभेट्टी व उमेश आगाशे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला .
पुणे मराठी टोस्मास्टर्स मंडळाच्या अध्यक्षा अर्चना पांडे यांनी या यशस्वी आयोजनासाठी ज्योती ,स्वप्नील ,प्रज्ञा, विवेक आणि संपूर्ण कार्यकारिणी सदस्य, स्वयंसेवक, स्पर्धक, आणि प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले.
स्पर्धकांनी हा एक उत्स्फूर्त आणि एक प्रेरणादायी अनुभव असल्याची प्रतिक्रिया दिली.
यंदाच्या वर्षी मराठीला “अभिजात भाषा” हा दर्जा मिळाल्याने, हा कार्यक्रम आणखीनच महत्त्वाचा ठरला. टोस्मास्टर्स इंटरनॅशनल च्या तत्त्वांनुसार आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि वक्तृत्व कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी अशा स्पर्धा आवश्यक आहेत. या उपक्रमामुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेकांना आपले वक्तृत्व कौशल्य अजमावण्याची संधी मिळाली.
