तीन दिवस पुस्तकांच्या गावातील वाचनसेवा तात्पुरती बंद
भिलार : पुस्तकांचं गाव, भिलार येथे गावची जत्रा असल्याने, बुधवार, दि. ०५ ते शुक्रवार दि. ०७ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत पुस्तकांच्या गावातील वाचनसेवा तात्पुरती बंद राहणार आहे, अशी माहिती प्रकल्प कार्यालयाने दिली.
या काळात भिलार गावात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मूळ गाव भिलार असलेले देशभरातील भिलारवासीय जत्रेच्या निमित्ताने गावास भेट देणार आहेत. त्यामुळे गावातील घरे (पुस्तकदालने) वाचकांना, पर्यटकांना आणि शालेय व महाविद्यालयीन सहलींना वाचनसेवा आणि पर्यटनविषयक सेवा देऊ शकणार नाहीत. मात्र, दि. ०८ फेब्रुवारी, २०२५ पासून सर्व संबंधित सेवा पूर्ववत सुरु होतील.
या पार्श्वभूमीवर, पर्यटकांनी व वाचकांनी सहकार्य करावे, अशी विनंती ग्रामपंचायत, भिलार आणि डॉ. शामकांत देवरे मा. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांनी केली आहे.
