Monday, June 8, 2026
Latest NewsSports

‘महाराष्ट्र राज्य युथ लीग’ फुटबॉल स्पर्धेत पुण्याच्या लौकिक फुटबॉल अ‍ॅकॅडमीला विजेतेपद !!

पुणे : ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्या मान्यतेखाली आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन तर्फे आयोजित ‘महाराष्ट्र राज्य युथ लीग’ फुटबॉल स्पर्धेत पुण्याच्या लौकिक फुटबॉल अ‍ॅकॅडमीने अंतिम सुपरसिकक्स फेरीमध्ये अपराजित राहून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष मंदार तम्हाणे आणि उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी, सचिव प्रदीप परदेशी यांनी आज जाहीर करताना सांगितले की, एआयएफएफ आणि डब्ल्युआयएफए च्यावतीने लोणावळा येथे ही अंतिम सुपरसिक्स फेरी घेण्यात आली होती. या अंतिम फेरीमध्ये सिटी एफसी-ठाणे, डिसुझा एफसी-मुंबई, वसई-विरार फुटबॉल क्लब-पालघर, डेरवन एफसी-रायगड, छत्रपती शिवाजी एफसी-कोल्हापूर हे पाच संघ पुण्याच्या लौकिक एफए संघांशी लढले होते. या पाचही संघांविरूध्दच्या सामन्यामध्ये लौकिक संघाने अपराजित राहून १५ गुणांसह अव्वल स्थान मिळवत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

लौकिक एफए संघातील आरूष सोनसाळे, सक्क्षम सिंग, बादल कांबळे, युग चव्हाण, दॅनिश गोनल, डेरेक शेरी, तरंग गुप्ता, वीर डेरे, नचिकेत कुलकर्णी, रूग्वेद घुले, रोनित मेनन, राज लोढा, मुदीत चौहान, शौर्य गुप्ता, शौर्य भोसले, अर्थव सक्सेना, पराग रावडे (मुख्य प्रशिक्षक) आणि संकेत पवार (सहाय्यक प्रशिक्षक) या सर्वांना या यशाचे श्रेय देण्यात आले आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण डब्ल्युआयएफएचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading