Monday, June 8, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

सर्वसमावेशक चित्रपट धोरण तयार करणार – निर्मात्या व समिती अध्यक्ष स्मिता ठाकरे यांचे प्रतिपादन


मुंबई : चित्रपट क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेऊन या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन तयार करत असलेले चित्रपट धोरण हे सर्वसमावेशक असेल असे प्रतिपादन ज्येष्ठ निर्मात्या व समिती अध्यक्ष स्मिता ठाकरे यांनी व्यक्त केले.

चित्रपट धोरण समितीची बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या.

कलाक्षेत्रात आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा,व्यवसाय करण्यासाठी आवश्यक सुलभता, कामगारांसाठी प्रशिक्षण,आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान, याबरोबरच चित्रपट क्षेत्रातील पर्यटन विकास, चित्रपटांसाठी वितरण व्यवस्था व कामगारांसाठी आवश्यक योजना आदी विषयातील सद्यस्थिती व भविष्यातील उपायोजना यांचा आढावा घेऊन समग्र चित्रपट धोरण निर्माण करण्यासाठी चर्चा करण्यात आली.

चित्रपट धोरण समितीमध्ये एकूण २२ सदस्य असून यामध्ये तीन शासकीय व १९ चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे.

यावेळी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील म्हणाल्या की, या समिती मध्ये विविध गट निर्माण करून विषयनिहाय चर्चा व अभ्यास करत या धोरणाचा प्राथमिक आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे.

प्रारंभी सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनंजय सावळकर यांनी चित्रपट धोरणाबाबत अभ्यासपूर्ण सादरीकरण केले

या बैठकीला वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, विशेष कार्यकारी अधिकारी संजय पाटील, सह संचालक श्रीराम पांडे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक राणे, सविता मालपेकर,नितेश नांदगावकर,मेधा धाडे,प्रिया कृष्ण स्वामी,उज्वल निरगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading