Monday, June 8, 2026
BusinessLatest NewsPUNE

एफएसआय शुल्कावर जीएसटी लागू केल्यास घरांच्या किमतीत १० टक्के वाढ होईल –  क्रेडाई पुणे मेट्रो

मागणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता

पुणे  : जीएसटी कौन्सिल मुळ एफएसआयवर तसेच अतिरिक्त एफएसआयवर १८% जीएसटी लागू करण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. असे घडल्यास घरांच्या किमतीमध्ये १०% वाढ होण्याबरोबरच नवीन घर खरेदीच्या मागणीवर देखील त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असे मत क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांनी व्यक्त केले.

एफएसआय म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स, ज्याला फ्लोर एरीया रेशिओ असेही संबोधले जाते. यानुसार शहराच्या त्या त्या भागात प्लॉटच्या आकारानुसार किती बांधकाम करता येईल ते ठरवले जाते.

अशा पद्धतीने एफएसआयवर जीएसटी आकारल्यास घरांच्या किमतीत होणारी वाढ ही मध्यम वर्गाच्या नवीन घर घेण्याच्या आर्थिक क्षमतेवर थेट परिणाम करेल. भारतात नवीन घरांची खरेदी करणारा सुमारे ७० टक्के ग्राहक हा मध्यमवर्गीय आहे. त्यामुळे घर बांधणी क्षेत्रावर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे.

आधीच जागेच्या आणि घर बांधण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वेगाने वाढत आहेत त्यावर हा जीएसटीची भर  पडल्यास गृहप्रकल्प हे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नाहीत. त्यामुळे सरकारने सद्य परिस्थिती आहे तशी ठेवत एफएसआयच्या किमतीला जीएसटीच्या कक्षे बाहेर ठेवावे अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचे नाईकनवरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading