Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

येत्या २६ ते २८ डिसेंबर दरम्यान मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे आयोजन

 

पिंपरी : – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, ही व्याख्यानमाला येत्या २६, २७ आणि २८ डिसेंबर रोजी इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे उपस्थित होते. व्याख्यानमालेचे यंदाचे १० वे वर्ष आहे.

व्याख्यानमालेतील उद्घाटनाचे पुष्प २६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता लोकसभेच्या माजी सभापती प‌द्मभूषण सुमित्रा महाजन गुंफणार आहेत. ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर त्या बोलणार आहेत. या पहिल्या पुष्पाचे अध्यक्षस्थान इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे भूषविणार आहेत. भारताला लाभलेल्या समृदध ज्ञान परंपरा आज सगळया जगाला दिशादर्शक ठरतील अशा आहेत. या ज्ञान परंपरा, वारसा आजच्या पिढीने जतन करुन ठेवला पाहिजे, या अनुषंगाने त्या बोलणार आहेत.
दुसऱ्या दिवशी २७ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांचे ‘बाप समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यांच्या या व्याख्यानामधून आई आणि बाप यांचे संवेदनशील नाते उलगडले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे उपस्थित असणार आहेत.

व्याख्यानमालेचा समारोप ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांच्या ‘चला उभारू नवी पिढी’ या विषयावरील व्याख्यानाने होईल. भारताची सुसंस्कृत, राष्ट्राभिमान निर्माण करणारी नवी पिढी घडविण्यासाठी त्यांचे मौलिक विचार दिशादर्शक ठरणार आहे. या समारोपाच्या अध्यक्षस्थानी माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड उपस्थित असणार आहेत.
या व्याख्यानमालेचा मावळ तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, पालक, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे संस्थेचे रामदास काकडे, सचिव चंद्रकांत शेटे, व्यााख्यानमालेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व खजिनदार शैलेश शहा आणि इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य व संयोजक डॉ. संभाजी मलघे यांनी केले आहे.

 

कार्यक्रमात इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रात योगदानासाठी ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांना, सांप्रदायिक क्षेत्रासाठीच्या भरीव योगदानासाठी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद यांना, क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल ऑलिम्पिक पटू मारुती आडकर यांना, पर्यावरण संवर्धनात केलेल्या कार्याबद्दल अलोक काळे, तर पत्रकारितेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार पं. सुरेश साखवळकर यांना गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading