Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणारा आरोपी हा मनोरुग्ण – एकनाथ शिंदे

नागपूर:  परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणारा आरोपी हा मनोरुग्ण असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली. या संबंधीचा वैद्यकीय अहवाल सादर करताना संबंधित व्यक्तीवर सन 2012 पासून मनोरोगासाठी उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

परभणीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात समाविष्ट असलेल्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना दत्तराव पोवार नावाच्या व्यक्तीने केली होती. ही घटना 10 डिसेंबर रोजी घडली. या घटनेने केवळ परभणीतच नव्हे तर राज्यभरात संतापाची लाट उसळली. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. 

या घटनेनंतर संतप्त जमावाने आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. परभणी स्थानकाकडे निघालेल्या सुमारे 60 ते 70 जणांच्या जमावाने रेल रोको आंदोलन केले. घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक देण्यात आली. या काळात आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातही तोडफोड केली. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने करून या घटनेचा निषेध करण्यात आला. 

नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील या घटनेचे पडसाद उमटले. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोपीच्या वैद्यकीय अहवाल सभागृहाला सादर केला. त्यानुसार आरोपी हा मनोरुग्ण असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading