Tuesday, September 22, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कल्याण मधील ‘त्या’ घरातील माता-भगिनी तुमच्या लाडक्या नाहीत का? राज ठाकरे यांचा सवाल

मुंबई:  लाडक्या बहिणीच्या नावाने मते मागणाऱ्यांनो, कल्याणमध्ये मराठीद्वेष करणारे टोळक्याने ज्या घरातील लोकांना बेदम मारहाण केली त्या घरातील माता-भगिनी तुमच्या लाडक्या नाहीत का, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे.

अखिलेश मिश्रा या शासकीय अधिकाऱ्याने खडकपाडा परिसरात आपल्याच सोसायटीत राहत असलेल्या मराठी कुटुंबातील सदस्यांना दहा-बारा जणांचा जमाव बोलवून धूप लावल्याच्या कारणावरून बेदम मारहाण केली. ही मारहाण करताना समस्त मराठी जणांचा अवमान करणारी विधाने केली. त्यावरून केवळ कल्याण मध्येच नव्हे तर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. 

या प्रकाराची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्रा याला तडकाफडकी निलंबित करीत असल्याची घोषणा केली. तसेच राष्ट्रीयत्वानंतर मराठी ही आपली प्रादेशिक ओळख आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाचा अवमान कदापिही सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सरकारलाही खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच परप्रांतीय महाराष्ट्राचा द्वेष करीत नाहीत. परोप्रांतातून आलेले अनेक जण पिढ्या आणि पिढ्या मराठी संस्कृतीची मिळून मिसळून राज्यात एकोप्याने राहत आहेत. मात्र, मागील काही वर्षापासून मराठी माणसांचा द्वेष करणाऱ्या परप्रांतीयांची पिलावळ महाराष्ट्रात वाढत आहे. कल्याण सारख्या घटना घडवून ते मराठी माणसाचा कणा तपासून पाहत आहेत. अशाच प्रकारची घटना काही दिवसापूर्वी गिरगाव येथे घडली होती. त्यावेळी माझ्या मनसैनिकांनी संबंधितांना चांगलाच चोप दिला होता. कालच्या घटनेच्या वेळी देखील संबंधितांना धडा शिकवण्यासाठी माझे सैनिक त्या ठिकाणी पोहोचले होतेच. मात्र, अशा दुष्टवृत्तींना चाप लावण्यासाठी सर्वसामान्य मराठी माणसाने जागे होण्याची गरज आहे, असे ठाकरे म्हणाले. 

यांचा डोळा राज्यातील जमिनींवर 

राज ठाकरे महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा द्वेष करणाऱ्या परप्रांतीय पिल्लावळीचा डोळा राज्यातील राज्यातील जमिनींवर आहे. यासंबंधी महाराष्ट्रातील जनतेने सजग राहणे आवश्यक आहे. अन्यथा हे लोक कधी तुमच्या पायाखालची जमीन खेचून घेतील आणि तुम्हाला नेस्तनाबूत करतील, याचा पत्ता देखील लागणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading