Monday, September 21, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

आता दिल्ली मध्येही आपची महिला सन्मान योजना

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

लवकरच होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेप्रमाणेच महिला सन्मान योजना लागू केली जाणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. 

दिल्लीत लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाकडे पाहून त्याच धर्तीवर दिल्लीत महिला सन्मान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेनुसार 18 वर्षावरील सर्व महिलांच्या बचत खात्यात दरमहा 1000 रुपये सरकारकडून जमा केले जाणार आहेत. 

‘आर्थिक क्षेत्रात मी जादूगार’ 

महिला सन्मान योजनेबाबत टीका करताना भारतीय जनता पक्षाने अविश्वास व्यक्त केला आहे. या योजनेसाठी निधी कुठून आणणार, असा त्यांचा सवाल आहे. केजरीवाल खोटं बोलत आहे असा त्यांचा दावा. त्यांना मी सांगू इच्छितो की, आर्थिक क्षेत्रातला मी जादूगार आहे. निधी कुठून कसा आणायचा हे मला चांगले समजते. मी जे बोलतो ते करून दाखवतोच, असे केजरीवाल म्हणाले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading