Thursday, June 18, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री सर्वोच्च शिखरापेक्षा उत्तुंग – राजनाथ सिंह

मॉस्को: वृत्तसंस्था 

भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री सर्वोच्च शिखरापेक्षा उत्तुंग आणि महासागरापेक्षा सखोल असून दोन्ही देशातील सहकार्य अनेक दृष्टीने परणामकरक आहे. उभयपक्षी प्रयत्नांनी अनेक क्षेत्रात मोठी झेप घेण्यास वाव आहे, असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. 

राजनाथ सिंह सध्या तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिंह यांनी पुतीन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीनेही शुभेच्छा दिल्या. 

भारत कायमच रशियाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे आणि यापुढील काळातही आम्ही तसेच ठामपणे रशियासोबत राहू, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी पुतीन यांना दिली. यावेळी राजनाथ सिंह आणि पुतीन यांनी दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातील भागीदारीला अधिक प्रभावी स्वरूप देण्याबाबत चर्चा केली. या भेटीपूर्वी राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांची वार्षिक द्विपक्षीय सामरिक सहकार्य बैठक पार पडली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading