पुस्तकांच्या ‘आदान-प्रदान’ला सुरवात
मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचा समावेश,
मुंबई – भांडुप या ठिकाणी अनेक मान्यवर लेखकांचे पुस्तक आदान-प्रदान महोत्सवात ठेवण्यात आली आहे. साहित्यिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे आदिंच्या जीवणावर आधारीत पुस्तके या ठिकाणी ठेवण्यात आली असून हि पुस्तके मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी केवळ आपण वाचलेली पुस्तके या ठिकाणी दान द्यायची आहे व त्याऐवजी तुम्हाला आवडतील ती पुस्तके तुम्ही घेऊन जाऊ शकता. ६ ते ८ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव दिना बामा पाटील ईस्टेट, भांडुप स्टेशन जवळ आयोजित करण्यात आला आहे.
६ ते ८ डिसेंबर दरम्यान पुस्तकांचे आदान-प्रदान होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पु.ल.देशपांडे, साने गुरुजी, गोपाळ गोडसे, अनंत तिबले, भालचंद्र मुणगेकर, डॉ विजया वाड आदींनी लिहलेल्या पुस्तकांचा संग्रह या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. टिपू सुलतान, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई रानडे, मदर तेरेसा, शरद पवार, इंदिरा गांधी, वसंतराव नाईक, अजित डोवाल आदींच्या जीवणावर आधारीत असलेली पुस्तके या ठिकाणी वाचकांना घेता येतील. वाचलेली पुस्तके दान करुन तुम्हाला आवडेल ते पुस्तक तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता ते देखील अगदी मोफत. हा महोत्सव ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कार्यालयाच्या आवारात भरविण्यात आला आहे. तर स्व. दिना बामा पाटील वाचनालय आणि अभ्यासिका यांच्या संयुक्तमाने पुस्तकांचे आदान-प्रदान महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. युवासेना कार्यकारणी सदस्य आणि वाचनालयाच्या सचिव राजोल संजय पाटील यांच्या पुढाकाराने या महात्सवाचे तसेच पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
