Monday Motivation : शर्वरीने बास्केटबॉल सोबत दिला ‘मंडे मोटिव्हेशन’चा अनोखा संदेश!
2024 हे शर्वरीसाठी अत्यंत महत्त्वाचं वर्ष ठरत आहे. मुंजाच्या ₹100 कोटींच्या ब्लॉकबस्टर यशानंतर, ग्लोबल हिट महाराज आणि थ्रिलर वेदाने तिने आपलं स्थान मजबूत केलं आहे. आता शर्वरी आपल्या करिअरमधील सर्वात मोठ्या प्रोजेक्ट, वायआरएफच्या अल्फा, साठी तयारी करत आहे.
आलिया भट्टसोबत शूटिंग करताना शर्वरीची तगडी फिटनेस सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर तिने बास्केटबॉल खेळताना आपल्या स्टायलिश मूव्ह्ज आणि फिटनेसचं प्रदर्शन करणाऱ्या छायाचित्रांद्वारे चाहत्यांना भुरळ घातली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं:
“मंडे : 0 – शर्वरी : 1 ⛹🏻♀️🏀 MondayMotivation”
पोस्ट येथे पाहा https://www.instagram.com/p/DDEQdUztYgz/?igsh=MTd1YTlyNXg3aWVhOA==
अल्फा, शिव रवैल यांनी दिग्दर्शित करत असुन (जे द रेलवे मॅनसाठी प्रसिद्ध आहेत), 25 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे. शर्वरीचा साध्या मुलीकडून बॉलिवूडच्या अॅक्शन स्टारपर्यंतचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे!
