Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRA

पराभवाने खचून न जाता नव्या उमेदाने पालिकेच्या निवडणुकीची तयारी करा – खा. संजय दिना पाटील

मुंबई :  पराभव झाला म्हणुन खचुन न जाता नव्या उमेदाने कामाला लागा. महापालिकेच्या निवडणुकीत आपला विजय निश्चित असून आतापासुनच त्याची तयारी करा. राज्यातील विधानसभेचा निकाल पाहता, आपणच कमी पडलो असे समजुन आपापले वार्ड आतापासूनच निश्चित करा. कोणाला कोणत्या वार्डातून निवडणुक लढवायची आहे. ते महाविकास आघाडीतील पक्षांनी लवकर ठरवावे. जेणे करुन उमेदवाराला आपल्या मतदार संघात अधिक वेळ देता येईल. असे वक्तव्य ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी भांडुप येथे केले.

भांडुप विधानसभा महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील बोलत होते. शिवसेनेचे विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांचा फारच थोड्या मतांनी पराभव झाला. कोरगावकर यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. त्यांनी केलेल्या विकास कामांचा मेहनता त्यांना विजयाच्या रुपाने मिळायला हवा होता पण तो मिळाला नाही. मात्र आता पराभव झाला आहे असे न समजता नव्या जोमाने आपापल्या वार्डात जाऊन काम करा. पालिकेच्या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. यावेळी रमेश कोरगावकर यांनी ही पदाधिका-यांना पालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्याच्या सुचना केल्या. यावेळी युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading