43व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेत आयओसीएलच्या सुमित नागल, बीपीसीएलच्या वैष्णवी आडकर यांना विजेतेपद
पुणे : भारत पेट्रोलियम यांच्या तर्फे 43व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेत पुरुष व महिला एकेरीत गटात अनुक्रमे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड(आयओसीएल)च्या सुमित नागल याने, तर महिला एकेरीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल)च्या वैष्णवी आडकर यांनी विजेतेपद संपादन केले. तर, प्रौढ गटात बीपीसीएल अच्या राजकुमार दुबेने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट पटकावला आणि प्रौढ सांघिक गटात ओएनजीसी संघाने विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरीत अंतिम लढतीत आयओसीएलच्या सुमित नागल याने ओएनजीसीच्या विष्णू वर्धनचा 6-4, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. महिला एकेरीत अंतिम सामन्यात बीपीसीएलच्या वैष्णवी आडकर हिने आयओसीएलच्या रिया भाटियाचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
प्रौढ एकेरीत अंतिम फेरीत बीपीसीएल अच्या राजकुमार दुबे याने मुनेश शर्माचा 8-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. याच गटात दुहेरीत अंतिम फेरीत बीपीसीएल अच्या राजकुमार दुबेने मुनेश शर्माच्या साथीत ओआयएलच्या सिद्धार्थ भराली व दिगंत बोरा यांचा 6-4, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. प्रौढ सांघिक गटात अंतिम फेरीत केएस रावत, अमिया सरकार यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर ओएनजीसी संघाने आयओसीएल संघाचा 2-1 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीपीसीएलच्या वित्तीय विभागाचे संचालक व्हीआरके गुप्ता, माजी डेव्हिस कप प्रशिक्षक नंदन बाळ, बीपीसीएलच्या एचआर विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक डी. पार्थसारथी, भारत पेट्रोलियमच्या क्रीडा विभागाचे सर व्यवस्थापक दिपक जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: पुरुष एकेरी: अंतिम फेरी:
सुमित नागल (आयओसीएल) वि.वि.विष्णू वर्धन (ओएनजीसी) 6-4, 6-3;
महिला एकेरी: अंतिम फेरी:
वैष्णवी आडकर(बीपीसीएल) वि.वि.रिया भाटिया(आयओसीएल) 6-4, 6-4;
प्रौढ एकेरी: अंतिम फेरी:
राजकुमार दुबे (बीपीसीएल अ) वि.वि.मुनेश शर्मा (बीपीसीएल अ) 8-6;
प्रौढ दुहेरी: अंतिम फेरी:
राजकुमार दुबे/मुनेश शर्मा (बीपीसीएल अ)वि.वि. सिद्धार्थ भराली/दिगंत बोरा (ओआयएल) 6-4, 6-3;
प्रौढ सांघिक गट: अंतिम फेरी:
ओएनजीसी वि.वि.आयओसीएल 2-1(एकेरी: केएस रावत वि.वि.त्रिभुवन कुमार 7-5, 6-0; एकेरी: सीएसके भंडारी पराभुत वि.पंकज गंगवार 6-0, 3-6, 4-6; दुहेरी: केएस रावत/अमिया सरकार वि.वि.पंकज गंगवार/सुभाष राजोरा 6-2, 6-3).
