सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, पुणे इन्स्टिट्यूटने कमिन्स इंडियाच्या रिडिफाइन २०२४ बी-स्कूल केस स्टडी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
आयआयएम तिरूचिरापल्ली इन्स्टिट्यूटने चमकदार कामगिरी करत उपविजेता पुरस्कार पटकावला
पुणे : कमिन्स इंडिया लिमिटेड या देशातील आघाडीच्या ऊर्जा सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने आपली प्रतिष्ठित वार्षिक बी-स्कूल केस स्टडी स्पर्धा ‘रिडिफाइन २०२४’ची सांगता केली. सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, पुणे येथील टीम मस्केटीअर्स स्पर्धेची विजेती ठरली. या टीमला प्रतिष्ठित ट्रॉफी व रोख बक्षीसासह सन्मानित करण्यात आले. तसेच, आयआयएम तिरूचिरापल्ली येथील टीम स्ट्रॅटेजिक मॅकक्वीन्स ने प्रतिष्ठित उपविजेता पुरस्कार पटकावला.
यंदाच्या स्पर्धेची थीम ‘हाऊ डिजिटल सोल्यूशन्स एनेबल सस्टेनेबिलिटी इन ट्रॅडिशनल बिझनेसेस?’ होती. सहभागींना समकालीन मर्यादांपलीकडे विचार करण्यास प्रेरित करण्यात आले. १२६० टीम्समध्ये सहभाग घेतलेल्या एकूण ३७८० विद्यार्थ्यांनी देशातील १८ टॉप बी-स्कूल्सचे प्रतिनिधीत्व केले, तसेच संकल्पना आणि नाविन्यपूर्ण विचारसरणीची देवाणघेवाण केली. सर्वसमावेशक मूल्यांकन प्रक्रियेनंतर सहा फायनालिस्ट टीम्सची निवड करण्यात आली, ज्यांनी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन-दिवसीय ग्रँड फिनालेमध्ये त्यांची सोल्यूशन्स सादर केली. या कार्यक्रमामध्ये परस्परसंवादात्मक नेतृत्व सत्रे, नेटवर्किंग संधी आणि कमिन्स टेक्निकल सेंटर इंडिया व कोथरूड इंजिन प्लांटच्या विशेष टूर्सचा समावेश होता. कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस (आयओसी) येथे अंतिम फेरी पार पडली.
अंतिम फेरीतील सादरीकरणाचे परीक्षण अनुपमा कौल, ह्युमन रिसोर्सेस लीडर; सुब्रमण्यन चिदंबरन, डायरेक्टर – कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि अजय पाटील, चीफ फायनान्शियल ऑफिसर या कमिन्स इंडियामधील नेतृत्वाने केले.
विजेत्यांचे अभिनंदन करत अनुपमा कौल, एचआर लीडर, कमिन्स इंडिया म्हणाल्या, ”मी रिडिफाइन २०२४ मध्ये दाखवण्यात आलेले अविश्वसनीय टॅलेंट आणि नाविन्यपूर्ण संकल्पना पाहून प्रभावित व प्रेरित झाले. सादर करण्यात आलेल्या काही सोल्यूशन्समध्ये उद्योगात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. मी सर्व विजेत्यांचे व सहभागींचे त्यांची अथक मेहनत आणि उल्लेखनीय योगदानासाठी अभिनंदन करते. ही स्पर्धा फक्त विजय मिळवण्यासाठी नाही तर शिकण्याबाबत, सहयोग करण्याबाबत आणि नाविन्यतेमधील मर्यादांना दूर करण्याबाबत आहे. रिडिफाइन आमच्या भविष्यामध्ये दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणूक आहे.
सुब्रमण्यन चिदंबरन, डायरेक्टर – कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, कमिन्स इंडिया म्हणाले, ”रिडिफाइन, मुलभूतरित्या, नाविन्यतेसाठी अद्वितीय प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म भावी नेतृत्वाला आजच्या व भावी आव्हानांचे निराकरण करण्यासाठी सर्जनशीलपणे विचार करण्यास सक्षम करतो. संपूर्ण विश्व हवामान बदलाचा सामना करत असताना यंदाच्या स्पर्धेने सहभागींना उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि शाश्वत उपक्रम वाढवण्यासाठी धोरणात्मक साधन म्हणून डिजिटलायझेशनच्या व्यापक क्षमतेचा अवलंब करण्याचे आव्हान दिले. या प्रखर स्पर्धेसाठी अधिक वेळ व प्रयत्नांची गरज होती आणि मला सर्व सहभागींची अथक मेहनत व समर्पिततेचा अभिमान वाटतो. मी भविष्यात ते संपादित करणारे यश पाहण्यासाठी तितकाच उत्सुक आहे.”
ग्रँड फिनालेमध्ये सहभाग घेतलेल्या सहा शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या टीम्स पुढीलप्रमाणे:
1. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे येथील पॉवर इनोव्हेटर्स
2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), लखनौ येथील टीम सीएनपी
3. आयआयएम मुंबई येथील कार्बन क्रशर्स
4. सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, पुणे येथील मस्केटीअर्स
5. आयआयएम तिरूचिरापल्ली येथील स्ट्रॅटेजिक मॅकक्वीन्स
6. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद येथील आयएसबी_१०१
रिडिफाइन २०२४ बाबत अधिक माहितीसाठी भेट द्या – कमिन्स रिडिफाइन । कमिन्स इन्क आणि अधिक कमिन्स इंडियाला लिंक्डइन, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब वर फॉलो करा.
–
