Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधे पुण्यामधील विविध विद्यापीठांच्या कुलुगुरुंचा परिसंवाद

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संधी आणि आव्हाने या विषयावर पुण्यामधील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत एका चर्चासत्राचं आयोजन करण्यातआलं होतं

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करताना वेगवेगळ्या विद्यापीठांना कोणकोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत तसेच यामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांनी काय नवनवीन प्रयोग केले तसेच हे धोरण राबवितांना काही आव्हाने समोर उभी राहिली आहेत का अशा विषयांवर पुण्यामधील सार्वजनिक विद्यापीठे, खासगी विद्यापीठे तसेच नवीन आणि जुनी विद्यापीठ अशा विविध विद्यापीठांमधील कुलगुरूंनी आपापले अनुभवकथन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि या धोरणामधील विविध पैलूंचा आपापल्या विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्या निर्मितीमध्ये कसा उपयोग केला गेला आणि त्यात नावीन्यपूर्णता आणून विद्यार्थ्यांना अधिकाधिक त्याचा उपयोग कशाप्रकारे करता येईल याविषयी प्रत्येक विद्यापीठांनी केलेल्या प्रयोगांची त्या त्या कुलगुरूंनी सविस्तर मांडणी केली.

या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळणकर यांचे हस्ते तसेच सुकाणू समितीचे अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ नितिन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू . डॉ सुरेश गोसावी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.

चर्चासत्राचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी केले. या परिसंवादात श्री बालाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गंगाधर शिरुडे, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ रवी चिटणीस, पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मणिमालापुरी, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रामकृष्ण रमण, अजिंक्य डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश जैन, जेएसपीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.बी.आहुजा, डॉ. डी. वाय पाटील, ज्ञानप्रसाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सोहन चितलांगे, विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ जबडे तसेच अलार्ड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर पूनम कश्यप यांनी सहभाग घेतला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख डॉ. सुप्रिया पाटील यांनी आभार मानले. हा उपक्रम पुणे बिझनेस स्कूलचे संचालक डॉ . गणेशराव आणि अधिष्ठाता डॉ . मीनाक्षी त्यागी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading