Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

प्रचंड शक्तिप्रदर्शन करत मनिष आनंद यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

 

पुणे : विधानसभा निवडणूकीत छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असेलले उमेदवार, खडकी कॅंटॉन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनिष आनंद यांनी सोमवारी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. एकच आनंद .. मनिष आनंद च्या घोषणांनी संपूर्ण परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडल्याचे पाहायला मिळाले.

मनिष आनंद यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुळा रोड येथील त्यांच्या कार्यालयापासून भव्य रॅलीची सुरुवात झाली. यामध्ये मनिष आनंद यांचे शेकडो समर्थक सहभागी झाले होते.खडकी, बोपोडी,औंध रोड,मॉडेल कॉलनी मार्गे निघालेल्या या रॅलीचा समारोप घोले रोड येथे करण्यात आला. यानंतर मनिष आनंद यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना मनिष आनंद म्हणाले, काल सायंकाळी कॉँग्रेस पक्षाने छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून आमच्या सहकाऱ्याला उमेदवारी जाहीर केली, आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी माघार नको ही कार्यकर्त्यांची भावना आहे. ज्या प्रमाणे आम्ही ठरवले होते त्या प्रमाणेच त्या त्या भागानुसार प्रचाराला सुरुवात करणार आहोत, आम्ही केलेली कामे जनतेसमोर आहेत त्याच कामांच्या आधारे जनतेला मी आशीर्वाद मागणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading