Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

नवक्षितिज संस्थेच्या विशेष मुलांनी अनुभवला सप्तपदी दुर्गा पूजा महोत्सव

सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वैभवशाली दुर्गा पूजा महोत्सवास प्रारंभ
पुणे  : बंगाली शैलीतील खास सजावट, विद्युत रोषणाई अन् फुलांची सजावट, बंगाली धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…अशा आनंदमय वातावरणात सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे सप्तपदी दुर्गा पूजा 2024 महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी नवक्षितिज संस्थेच्या विशेष मुलांनी उपस्थित राहून या अनोख्या व पारंपरिक महोत्सवाचा आनंद लुटला. पुण्यातील साफा बँक्वेटस, बालेवाडी हायस्ट्रीट येथे 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरु असणाऱ्या या महोत्सवात  आनंद मेळावा, पारंपरिक पद्धतीने होणारी दुर्गा पूजा, महाआरती, भोग, सिंदूर खेला यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम  आणि पारंपरिक बंगाली फूड फेस्टिवलचा समावेश असणार आहे.   तसेच, पारंपरिक पद्धतीने बंगाली दुर्गोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
 याप्रसंगी पारंपरिक बंगाली वेशभूषा करून भक्तांनी  दुर्गादेवीसमोर केले जाणारे धूनुची हे भक्तिमय नृत्य सादर केले. यावेळी सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय बिस्वास, सरचिटणीस सौमित्र कुंडू व खजिनदार राज भनोट आदी मान्यवर उपस्थित होते.
11 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजून 24 मिनिटांनी संधी पूजा त्यानंतर बलिदान आणि  सकाळी 9 पासून नवमी पूजा व पाठोपाठ पुष्पांजलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7वाजता संध्या आरती होणार असून  सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता पूजेला प्रारंभ होईल. 13 ऑक्टोबर रोजी विसर्जन होणार असून सकाळी 10 वाजता देवी बोरोन व सिंदूर दान हे कार्यक्रम पार पडतील.
या व्यतिरिक्त सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आनंद मेळा ,पारंपरिक बंगाली भोग आणि फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading