Tuesday, October 6, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

माजी क्रिकेटपटूच्या आईची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या

पुणे : भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आई अशोक अंकोला यांची त्यांच्या प्रभात रस्त्यावरील राहत्या घरात अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

असा उघडकीस आला प्रकार ….

अंकोला यांच्या घरी काम करणाऱ्या बाई सकाळी आल्यानंतर बेल वाजवूनही दार कोणीच उघडले नाही. त्यानंतर कामवाल्या बाईंनी ओळखीच्या नागरिकांना हा प्रकार सांगितला; तेव्हा त्यांनी तयांच्या मुलीशी सांपर्क साधून वडिलांना घरी जाण्यासाठी सांगितले. घरी आल्यावर दार उघडताच त्यांना सलील अंकोला यांच्या आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याची खूण होती. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कोण आहेत माजी क्रिकेटपटू सलील अंकोला ?

मुळच्या सोलापूरचे आसलेल्या सलील अंकोला यांनी मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या सोबतच 15 नोवहेबर 1989 मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  90 च्या दशकात भारतीय क्रिकेट संघात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली सारख्या दिग्गजांसोबत सलील अंकोला यांनी विश्वषक देखील खेळला आहे. मात्र भारतीय संघात ते काही करिश्मा दाखवू शकले नाही. काही वर्षा नंतर त्यांना टयुमर डिटेक्ट झाला. अन् त्यांचे अॅपरेशान भारतात योग्य प्रकारे झाले नाही. त्यामुळे सलील अंकोला नैराश्यात गेले. व त्यांचे क्रिकेट करियर संपुष्टात आले. त्यानंतर त्यांनी मॉडलिंगमध्ये करियर बनवायचा प्रयत्न केला. अदनान सामी च्या ‘कभी तो नजर मिलाओ.. ‘ या गाण्यासह अनेक tv मालिकांमध्ये ही सलील अंकोला दिसले होते. बिगबॉस मध्ये ही त्यांचा समावेश होता. त्यानंतर नैराश्य आणि दारूच्या नशेत असणारे सलील अंकोला  काळाच्या पडद्याआड गेले. पण कालांतराने त्यांनी कम बॅक केलं. दारूचे व्यसन सोडले. त्यांना कामं मिळायला लागली. अखेर 2020 मध्ये त्यांनी पुन्हा क्रिकेटकडे वळत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading