गोखले कंस्ट्रक्शन्सच्या प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे उद्घाटन
पुणे : गोखले कंस्ट्रक्शन्सनच्या नवरात्रातील प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे उद्घाटन आज बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे व लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटीव्ह सोसायटीचे पुणे विभाग प्रमुख सुशील जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी सुशील देशमुख, योगिनी पोकळे, अतुल गलांडे, सुव्रत देशपांडे, विशाल गोखले, पूनम गोखले व अर्चित गोखले आदी उपस्थित होते. सिटी प्राईड कोथरूड समोर साकारात असलेल्या गोखले बिझनेस बे या भव्य व्यापारी संकुलात सदर उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
याविषयी माहिती देताना गोखले कंस्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले म्हणाले की सदर महोत्सवाचे हे सलग १२ वे वर्ष असून शहरातील मोक्याच्या ठिकाणी साकारणाऱ्या विविध प्रकल्पांचे पर्याय व आर्थिक दृष्ट्या अत्यंत लाभदायक अशा योजना यामुळे घर किंवा ऑफिस घेवू इच्छिणारे ग्राहक कायमच या प्रॉपर्टी फेस्टिव्हलला उत्तम प्रतिसाद देतात. नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिव्हलमध्ये गोखले कंस्ट्रक्शन्सतर्फे अनेक आकर्षक सवलती देखील दिल्या जातात त्या यंदा देखील कायम असतील.
यावर्षी ३ ते ११ ऑक्टोबर या नवरात्रीच्या ९ शुभ दिवसांमध्ये घरखरेदीदारांना प्रभात रस्ता, सहकार नगर, करिष्मा चौक – कोथरूड, मॉडेल कॉलनी व कर्वे नगर येथे नजीकच्या भविष्यात साकारणाऱ्या भव्य व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असणाऱ्या गृहप्रकल्पांच्या माध्यमातून ३ व ४ बीएचकेच्या प्रशस्त सदनिका तसेच या प्रकल्पांमधील पेंटहाउस आदी पर्याय उपलब्ध असतील. साधारणतः १६०० ते ८००० चौरस फुट या दरम्यान सदनिकांचे आकारमान असेल ज्याची किंमत रुपये अडीच कोटी ते पंधरा कोटी अशी असेल अशी माहिती विशाल गोखले यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की कोथरूडच्या अत्यंत मध्यवर्ती भागात निर्माण सुरु असलेल्या ‘गोखले बिझनेस बे’ या आलिशान व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या फेजमध्ये ऑफिस घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी विशेष अशी ‘फिफ्टी – फिफ्टी’ योजना यंदाच्या प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे एक प्रमुख वैशिष्ट्य असेल. यामध्ये कोथरूड परिसरातील अशा प्रकारच्या पहिल्याच आधुनिक व्यापारी संकुलात ५०% रक्कम भरून ऑफिस घेतल्यास उर्वरित ५०% रक्कम ही पुढील नवरात्र महोत्सवात ताबा घेते वेळी भरता येईल.
