Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRA

अजित पवारांना आणखी एक धक्का; भोसरीचे माजी आमदार विलास लांडे तुतारी फुंकणार

पिंपरी : दीर्घकाळ संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) गटात आपली डाळ शिजत नसल्याचे लक्षात येतात तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पुत्र विक्रांत लांडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून रिंगणात उतरतील, असे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लांडे यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी स्वगृही परतण्याची तयारी केली. त्या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांची घरवापसी होणार हे निश्चित झाले आहे.

यापूर्वी दीर्घकाळ लांडे हे शरद पवार गटात परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झडत होती. मात्र, स्वतः लांडे यांनी आपल्या घरवापसीबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे लांडे हे नेमके राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात, याबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या नाटकाचा पडदा आता उघडला गेला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading