Sunday, June 7, 2026
Latest NewsLIFESTYLEPUNE

कार्डिओमायोपॅथी च्या रुग्णांसाठी नवा आशावाद: डॉ. विद्यासागर ऊमाळकरांची होमिओपॅथिक “व्ही-थेरपी” .

सुप्रसिद्ध होमिओपॅथिक हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विद्यासागर उमाळकर हे त्यांच्या चैतन्य होमिओ हार्टकेअर क्लिनिक आणि रिसर्च सेंटरमध्ये ३५ वर्षांपासून विविध हृदयरोगांवर यशस्वी रित्या उपचार करत आहेत. डाॅ.उमाळकरांनी संशोधित केलेल्या “व्ही-थेरपी”ने (“V-Therapy) हजारो रुग्णांना शस्त्रक्रिया न करता पूर्णतः हृदयरोगमुक्त केले आहे. जागतीक स्तरांवर होणा-या एकुण मृत्यूंपैकी ३०% मृत्यू केवळ हृदयरोगांमुळेआणि यात भारताचा वाटाच अत्याधिक आहे.

अनेक हृदयरुग्ण शस्त्रक्रिया करूनही रक्तवाहिन्यांमध्ये पुनः ब्लॉकेजेस निर्माण अनुभव घेत आहेत. यावर पर्याय म्हणून डॉ. ऊमाळकरांनी सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी होमिओपॅथिक व्ही-थेरपी अविरत संशोधनांती विकसित केली आहे व १५,००० पेक्षाही अधिक रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे. हृदयरोगांमधे अनेक प्रकार आहेत.त्यापैकी कार्डिओमायोपॅथी हा अत्यंत क्लिष्ट व गंभीर असा हृदयाच्या स्नायुंचा आजार आहे. जो नकळतपणे उत्तरोत्तर वाढत जातो .

याचे अनेक प्रकार आहेत पण प्रामुख्याने तीन प्रकार आढळतात.

       1.डायलेटेड कार्डिओमायोपॅथी- हा मुख्यतः आढळणारा प्रकार आहे ज्यामध्ये डाव्या वेंट्रिकलचा विस्तार होतो आणि                 पुरेसे रक्त पंप करण्याची त्याची क्षमता कमी होते. हा योग सामान्यतः मध्यमवयीन पुरुषांमध्ये दिसून येतो.

  1. हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी- या मधे हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलचे स्नायू अनैसर्गीकरित्या जाड होतात.त्यामुळे रक्त पंप करण्याची त्याची क्षमता कमी होते. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. लहान मुलांमधे यांचे प्रमाण जास्त असते.
  2. रिस्ट्रीक्टीव्ह कार्डिओमायोपॅथी-
    हा सर्वात कमी आढळणारा प्रकार आहे .यामधे हृदयाचे स्नायू अधिक कडक होतात ज्यामुळे हृदय योग्यरित्या पंप करू शकत नाही. हा ब-याचदा वृद्ध लोकांमध्ये दिसून येतो.

कार्डिओमायोपॅथीची कारणे
• अनुवांशिकता
• तीव्र जलद हृदय गती
• दीर्घकालीन उच्च रक्तदाब
• हृदयाच्या झडपांच्या समस्या
• हृदयविकाराच्या झटक्याने हृदयाच्या स्नायुंचे झालेले नुकसान
• मद्यपान
• लठ्ठपणा,थायरॉईड, मधुमेह
• मादक पदार्थांचे सेवन
व इतर अज्ञात कारणे.

कार्डिओमायोपॅथीची लक्षणे
• जलोदर
• अधिक श्रमांमुळे किंवा अगदी विश्रांतीमुळेही श्वास लागणे
• छातीत दुखणे
• झोपताना खोकला येणे
• चक्कर येणे, डोके दुखणे आणि बेशुध्द पडणे
• थकवा जाणवणे
• हृदयाचे अनियमित ठोके
• पाय, घोट्यांना सूज येणे

कार्डिओमायोपॅथी चे निदान करण्यासाठी डॉक्टर खालील चाचण्या करू शकतात:
• छातीचा एक्स-रे (हृदय मोठे झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी)
• इकोकार्डियोग्राम (हृदय आणि झडपांचे कार्य तपासण्यासाठी)
• कार्डियाक मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (MRI) (इकोकार्डियोग्राफी निदानासाठी उपयुक्त नसल्यास)
• इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) (हृदयातील अवरोध आणि हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता तपासण्यासाठी)
• ट्रेडमिल स्ट्रेस टेस्ट (व्यायामामुळे हृदयाची लय असामान्यपणे वाढल्यास लक्षणांचे मूल्यांकन करण्यासाठी)
• कार्डियाक कॅथेटेरायझेशन (हृदय योग्यरित्या रक्त पंप करत आहे की नाही हे तपासण्यासाठी)
• संगणकीकृत टोमोग्राफी (CT स्कॅन) (हृदयाच्या आकाराचे आणि कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी)
• रक्त तपासणी (रक्तातील साखरेची आणि चरबीचे प्रमाण ,थायरॉईड, मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य तपासण्यासाठी)

डॉ. ऊमाळकर यांनी व्ही थेरपी द्वारे विविध प्रकारच्या कार्डिओमायोपॅथीवर यशस्वी उपचार करुन अनेक रुग्णांच्या हृदयाची कार्यक्षमता वाढवली आहे.
अतिदक्षता कक्षात गंभीर परिस्थितीमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्यामस्क्युलर डिस्ट्रॉफी सह कार्डिओमायोपॅथीच्या रुग्णामधेही डॉ. उमाळकरांच्या होमिओपॅथिक व्ही थेरपीने उल्लेखनीय सुधारणा झाली आहे.

सर्वे संतु निरामय: हे ब्रिद असलेल्या डॉ. ऊमाळकर यांना लायन्स क्लबचा हृदयमित्र पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाच्या होमिओपॅथिक कौन्सिलचा २०१२ चा जीवन गौरव पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हृदय शस्त्रक्रिया शक्य नसलेल्या, शस्त्रक्रिया टाळू ईच्छिणा-या वा शस्त्रक्रिया करुन सुध्दा आजार पुन्हा उद्भवल्याची लक्षणे दिसत असलेल्या असंख्य रुग्णांच्या आशा डाॅ.उमाळकर संशोधित होमिओपॅथिक व्ही थेरपी मुळे पल्लवित झाल्या आहेत .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading