Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जागा वाटपाबाबद मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तब्बल पाच तास खलबत

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती मधील जागावाटपाबाबत शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तब्बल पाच तास चर्चा पार पडली. या चर्चेनंतर महायुतीच्या जागावाटपाबाबत निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा केली जात आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा नुकताच नाशिक दौरा पार पडला. हा दौरा आटोपल्यानंतर या तिघांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यात निवडणूक वेळापत्रक आखण्यासंबंधी या पथकाने राज्यातील 11 राजकीय पक्षांशी चर्चा केली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्यातील सण वार लक्षात घेऊन निवडणुकीचे वेळापत्रक आखण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. त्यानुसार सणांचे दिवस टाळून निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल, असे चित्र आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या पथकाने केलेल्या दौऱ्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून राजकीय घडामोडी, विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading