Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

युवा कलाकारांचा राहुल देशपांडे यांच्या हस्ते गौरव

पुणे : कलेच्या क्षेत्रात उत्तम कामिगिरी करणाऱ्या युवा कलाकारांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. श्री बालाजी विद्यापीठ पुणे’च्या (एसबीयुपी) स्कूल ऑफ लिबरल आर्टस तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमादरम्यान आलापिनी निसळ (कथक), करण देवगावकर (शास्त्रीय गायन) व महिमा ठोंबरे (थिएटर) या युवा कलाकारांना ‘यंग अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी एसबीयुपीचे कुलपती बी. परमानंदन, कुलगुरू डॉ. गंगाधर शिरुडे, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या प्राचार्या डॉ. प्रीती जोशी व डॉ मनीषा शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

एसबीयुपीचे रौप्य महोत्सवी वर्ष व स्कूल ऑफ लिबरल आर्टसचे स्थापना वर्ष या निमित्ताने संस्थेच्या भव्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार राहुल देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शिक्षणासोबत कला जोपासणे देखील तितकेच महत्वाचे आहे ही बाब तरुण विद्यार्थ्यांसमोर अधोरेखित करण्याच्या दृष्टीकोनातून या ‘यंग अचिव्हर्स’ पुरस्कारांना यावर्षी पासून सुरुवात करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. गंगाधर शिरुडे यांनी दिली. कार्यक्रमात यानंतर राहुल देशपांडे यांचा गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading